Biparjoy Cyclone Update :
बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमध्ये हाहाकार माजवल्यानंतर राजस्थानमध्ये दाखल झालं आहे. वादळी वाऱ्यासह राजस्थानात धो-धो पाऊस बरसत आहे. राजस्थानच्या विविध जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाचा जोर कायम असून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा तडाखा राजस्थानला चांगलाच बसला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीला लवकरच मोठी गळती…धमाके पाहायला तयार रहा : भाजपच्या खासदाराने दिला इशारा
काल रात्रीपासून राजस्थानमधील शेवडा, धनाळ, धोरिमाण्णासह बाडमेर, जालोरमध्ये पावसाने चांगलाच जोर धरला आहे. चक्रीवादळामुळे बरसलेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजस्थानात बिपरजॉय वादळामुळं ताशी 45 ते 60 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहत असून इथल्या जवळपास 5 हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानातील विविध जिल्ह्यांत रेड अलर्टचा इशारा देण्यात आला होता. चक्रीवादळामुळे कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत असून एसडीआरएफची टीमही तैनात करण्यात आलेली आहे.
अनुदान केंद्र सरकारचं अन् गवगवा भाजपचा; अनुदानित खतांच्या पिशव्यांवर BJP चा प्रचार
बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाली असून बाडमेरसह जालोरमधील झोपडपट्टी आणि कच्च्या घरांत राहणाऱ्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणचे विजेचे खांब कोसळले असून 100 पेक्षा अधिक गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
काल रात्रीपासून बखासरमध्ये सर्वप्रथम बिपरजॉयचा प्रभाव दिसून आला आहे. त्यानंतर शेवडा, बखासर, धनाळ, चौथण, धोरिमाण्णा येथे मुसळधार पाऊस झाला. हवामान खात्याने शनिवारी (17 जून) बारमेर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला होता. या पार्श्वभूमीवर एसडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. याशिवाय प्रशासनाकडून लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
समान नागरी कायद्यासाठी केंद्राने मागवली मते, 30 दिवसांच्या आत ‘ह्या’ लिंकवर म्हणणे मांडा
राजस्थानच्या माउंट अबूमध्ये 210 मिमी, बाडमेरच्या सेवदामध्ये 136 मिमी, माउंट अबू तहसीलमध्ये 135 मिमी, जालोरच्या राणीवाडामध्ये 110 मिमी, चुरूच्या बिदासरामध्ये 76 मिमी, रेवदारमध्ये 68 मिमी, सांचोरेमध्ये 59 मिमी आणि पिनवर 5 मिमी पाऊस पडला आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानातील नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये या चक्रीवादळामुळे सुमारे 150-200 विद्युत खांब पडले आहे तर सुमारे 180-200 झाडे पडली आहेत. तसेच 6 वीज उपकेंद्र बंद आहेत. 15 जलनिर्मिती केंद्रांवर समस्या आहेत परंतु त्यांना जनरेटर संचाचा आधार देण्यात आला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात
आली आहे.