Haryana Election Result 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या हरियाणा (Haryana) आणि जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) मधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. हरियाणात तिसऱ्यांदा भाजप (BJP) सरकार स्थापन करणार आहे तर 370 कलम रद्द केल्यानंतर पहिल्यांदा होत असलेल्या जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स (NC) तब्बल 42 जागांवर विजय मिळवत इंडिया आघाडीसह सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने 42 तर काँग्रेसने 6 जागांवर विजय मिळावला आहे तर भाजपला 29 जागा जिंकता आल्या आहे मात्र नौसेरा मतदारसंघात भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना (Ravindra Raina) यांचा पराभव झाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच यावेळी झालेल्या निवडणुकीत जम्मू काश्मीरमध्ये 7 अपक्ष उमेदवार जिंकले आहे. तर पीडीपीला तीन जागा जिंकण्यात यश आले आहे.
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर उमर अब्दुल्ला म्हणाले की, आमच्या पक्षाने आणि आघाडीने ज्या प्रकारचा विजय मिळवला त्याबद्दल मी माझ्या राज्यातील जनतेचा आभारी आहे. मिळाले. जनतेने अपेक्षेपेक्षा जास्त पाठिंबा दिला. आता जनतेच्या या मतांची पात्रता सिद्ध करण्याचा आमचा प्रयत्न असेल. असं उमर अब्दुल्ला माध्यमांशी बोलताना म्हणाले.
तर दुसरीकडे हरियाणामध्ये भाजपने 48 जागांवर विजय मिळवत तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची तयारी सुरु केली आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 37 जागांवर विजय मिळाला आहे. हरियाणा निवडणुकीनंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये 10 वर्षानंतर काँग्रेस सरकार स्थापन करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता मात्र सर्व एक्झिट पोल फेल ठरले असून हरियाणामध्ये तिसऱ्यांदा भाजप सरकार स्थापन करणार आहे.
सत्ता विरोधी वातावरण अन् विरोधकांचा हल्लाबोल तरीही भाजपने हरियाणात मारलं मैदान, जाणून घ्या कसं?
लाडवा मतदारसंघातून मुख्यमंत्री नायब सैनी विजयी झाले आहेत. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप कार्यकर्त्यांना दिले आहे. तर हरियाणाचे मंत्री अनिल विज देखील विजय झाले आहे तर पाच मंत्र्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.