Download App

श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा उत्सव होणार? “22 जानेवारील सार्वजनिक सुट्टी द्या” : भाजपची मागणी

मुंबई : अयोध्येतील मंदिरात श्रीरामांच्या (Shree Ram Mandir) मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. सर्वच भारतीयांसाठी हा महत्वाचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या दिवशी सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे. या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावे, त्याचे साक्षीदार होता यावे, यासाठी 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भाजपच्यावतीने (BJP) करण्यात आली आहे. (BJP has demanded that a public holiday be declared on January 22 For Ram Mandir)

महाराष्ट्रात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. याशिवाय कर्नाटकमध्येही भाजप आमदारांनी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांना पत्र लिहून 22 जानेवारीला सुट्टी देण्याची मागणी केली आहे. सोबतच मध्यप्रदेश आणि देशातील अन्य राज्यांमध्येही अशा प्रकारची मागणी पुढे येत आहे. अद्याप कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय जाहीर केलेला नाही.

INDIA : नितीश कुमारांचे ‘प्रेशर पॉलिटिक्स’ यशस्वी? काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

काय म्हणाले अतुल भातखळकर?

आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात, 22 जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. सुमारे 500-550 वर्षांचा संघर्ष या प्रभू राम मंदिर उभारणीसाठी करण्यात आला आहे. शेकडो राम भक्तांनी यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हे मंदिर उभारणीचे काम झाले आहे. प्रभू श्री राम मंदिरात विराजमान होणार या दिवसाची तमाम राम भक्तांना प्रतीक्षा आहे.

Seema Haider : नववर्षात सीमा हैदरने दिली गुड न्यूज, सचिनच्या मुलाची होणार आई

त्या दिवशी घरोघरी दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रत्यक्ष जाता येत नसले तरी त्या दिवशी आपापल्या भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन सर्वत्र करण्यात आले आहे. या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थित राहता यावे, सोहळ्यात सहभागी होता यावे, यासाठी त्या दिवशी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी तसेच खासगी आस्थापनांना अशा स्वरूपाचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे

follow us

वेब स्टोरीज