Download App

लोकसभेच्या खासदारांनी ७ ते ११ ऑगस्ट दरम्यान सभागृहात उपस्थित राहावं; भाजपकडून तीन ओळींचा व्हिप

Image Credit: letsupp

BJP Issues 3 Line Whip : संसदेचं अधिवेशन अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं जात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता भाजपकडून सर्व खासदारांना 7 ते 11 ऑगस्टदरम्यान, खासदारांना तीन ओळींचा व्हिप जारी करण्यात आला आहे. भाजपने एकूण 5 दिवसांचा व्हिप जारी केला आहे. या कालावधीत खासदारांना उपस्थित राहण्याबाबत सांगण्यात आलं आहे.

Nitin Desai Death : नितीन देसाईंना न्याय मिळणार? आत्महत्येप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

लोकसभेत नूकताच दिल्ली सेवा विधेयक मंजूर करण्यात आला आहे. आता दिल्लीचं विधेयक राज्यसभेत मंजूर करण्याकडे भाजपचं लक्ष आहे. दरम्यान, मणिपूर हिंसाचार प्रकरणावरुन विरोधकांकडून सरकाविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान या प्रस्तावर चर्चा होणार आहे.

Pune : “माझ्या संपूर्ण शरीरावर बॉम्ब”; वृद्ध महिलेच्या दाव्याने पुणे विमानतळावर खळबळ

तसेच 10 ऑगस्टला विरोधकांच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत. याप्रसंगी विरोधी पक्षाच्या खासदारांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे. त्यामुळेच एकूण परिस्थिती पाहुन भाजपकडून 7 ऑगस्ट ते 11 ऑगस्टसपर्यंत तीन ओळींचा व्हिप जारी करण्यात आला आहे.

सत्ताधारी आणि विरोधकांच्या चर्चेदरम्यान, सत्ताधाऱ्यांच्या बाकावर पुरेशा संख्याबळासाठीच भाजपकडून अशा सूचना देण्यात आल्या असून त्यासाठीच हा व्हीप जारी करण्यात आलेला आहे.

दरम्यान, मणिपूर घटनेवरुन अविश्वास प्रस्ताव आणण्यात आल्याने आत्तापर्यंत अनेकदा संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ऑगस्ट रोजी उत्तर देणार आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज