Download App

भाजप नेते बृजभूषण यांचा मुलगा करण सिंहच्या ताफ्यातील कारने तिघांना चिरडलं; दोघांचा मृत्यू

भाजप नेते बृजभूषण यांच्या मुलाच्या ताफ्यातील कारने तिघांना चिरडलं. त्यामध्ये दोघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे.

Gonda Car Accident : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेले भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांचा मुलगा करण भूषण आणि कैसरगंज येथील भाजप उमेदवार यांच्या ताफ्याच्या फॉर्च्युनर गाडीने दोन दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना समोर आलीये. येथील गोंडा परिसरात ही घटना घडली. (Car Accident) तसंच, यामध्ये रस्त्याच्या कडेला बसलेल्या महिलेलाही कारने धडक दिली आहे. (Karan Singh)  या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.

भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांना न्यायालयाचा धक्का! लैंगिक छळ प्रकरणात नव्याने चौकशीची मागणी फेटाळली

विजेच्या खांबाला धडकली

या गाड्यांच्या ताफ्यात फॉर्च्युनर कार होती ज्यामध्ये भाजपचे उमेदवार करण भूषण सिंहदेखील होते अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास ते आपल्या ताफ्यासह हुजूरपूरकडे जात होते. एस्कॉर्ट लिहिलेल्या फॉर्च्युनरने एका वाहनाला ओव्हरटेक करण्यास सुरुवात केली तेव्हा हा ताफा नुकताच छताईपुरवा येथे पोहोचला होता. यावेळी वाहनाचं नियंत्रण सुटलं आणि त्यांमध्ये त्यांनी दुचाकीस्वारांना चिरडलं. पुढे कार विजेच्या खांबाला धडकली ज्यामध्ये घराबाहेर बसलेली वृद्ध महिला गंभीर जखमी झाली.

गाड्यांचा ताफा थांबला नाही

यावेळी इतक्या लोकांना चिरडल्यानंतर आणि दोघांचा यामध्ये जीव गेल्यानंतरही करण सिंह यांचा हा गाड्यांचा ताफा थांबला नाही. या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी संतापाची लाट आहे. दम्यान या अपघातात रेहान (17) आणि निदुरा गावातील शहजाद खान (24) यांचा मृत्यू झाला आहे. तर 60 वर्षीय सीता देवी गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

संस्थेचे व्यवस्थापक खासदार बृजभूषण

मृताच्या नातेवाईकांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार तपासात फॉर्च्युनर कार जप्त करण्यात आली आहे. तसंच, चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. फॉर्च्युनरच्या पुढील भागाचे नुकसान झालं आहे. एअरबॅग उघडल्याने कारमध्ये बसलेल्या लोकांचे जीव वाचले अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक पश्चिम राधेश्याम राय यांनी दिली आहे. यामधील फॉर्च्युनर कारचा क्रमांक (UP 32 HW 1800)हाआहे. ही गाडी आरटीओमध्ये नंदिनी शिक्षण संस्थेच्या नावाने नोंदणीकृत आहे. या संस्थेचे व्यवस्थापक खासदार बृजभूषण सिंह आहेत.

follow us

संबंधित बातम्या