Download App

अमित शाहंनी महिन्याभरात बोल खरे केले… एका छोट्या माणसाला ‘बडा आदमी’ बनवून दाखविले!

“विष्णुदेव साय को विधायक बनाएं. उनको ‘बड़ा आदमी’ बनाने का काम हम करेंगे”. नोव्हेंबर महिन्यात छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरु असतानाच गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी हे आश्वासन दिले होते. अवघ्या महिन्याभरात त्यांनी त्यांचे हे बोल खरे करुन दाखवले आहेत. एका आदिवासी कुटुंबातून येणारे साय (Vishnu Deo Sai) छत्तीसगडचे (Chhattisgarh) मुख्यमंत्री बनले आहेत. शाह यांनी एका महिन्यात बोल खरे केले असले तरी साय यांना इथेपर्यंतचा प्रवास करायला अनेक दशके प्रयत्न करावे लागले आहेत. साय यांचा हा छोटा से बडा आदमी बनण्याचा प्रवास प्रेरणादायी आहे. (BJP leader Vishnu Deo Sai takes oath as the Chief Minister of Chhattisgarh, in Raipur)

घरी अठरा विश्व दारिद्र्य, त्यात आदिवासी पार्श्वभूमी. चौथीत शिकत असताना विष्णुदेव यांच्या डोक्यावरून वडील रामप्रसाद साय यांचे छत्र हरपले. आई जसमनी देवी यांनी ओमप्रकाश, जय प्रकाश, विनोद आणि विष्णू या चार मुलांना घेऊन संसाराचा गाडा ओढायला सुरुवात केली. चारही मुलांनी परिस्थितीची जाण ठेवत संघर्ष करायला सुरुवात केली. विष्णू यांनी आर्थिक संकटांशी झटून कसेबसे पाचवीपर्यंत शिक्षण घेतले. तिथून पुढे शिक्षण घ्यायची इच्छा होती पण मदत मिळत नव्हती. मात्र हार न मानता त्यांनी कुनकुरीमध्ये एका कच्च्या घराच्या छोट्या खोलीत राहून अकरावी पर्यंतचे शिक्षण घेतले.

Parliament Security Breach : संसदेत धूर करून ‘तानाशाही नहीं चलेगी’ म्हणणारे चौघं कोण?

जबाबदाऱ्यांमुळे पुढचे शिक्षण घेता आले नाही. पण ते मागे हटले नाहीत. डाव सोडला नाही. शेती करत असतानाच ते समाजसेवेशी जोडले गेले आणि तिथून भाजपचे दिग्गज नेते दिवंगत दिलीप सिंह जुदेव यांच्या संपर्कात आले. त्यांच्याकडूनच त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. त्यानंतर ते 4 वेळा खासदार झाले. मोदींच्या पहिल्या कार्यकाळात केंद्रीय मंत्रीही बनले. 2019 मध्ये भाजपने छत्तीसगडमधील एकाही खासदाराला पुन्हा तिकीट दिले नाही. साय यांचेही तिकीट कापले.

मोठी बातमी : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक घ्या, हायकोर्टाचे आयोगाला आदेश

पण भाजपने त्यांचे महत्व ओळखले होते. साय यांच्या खांद्यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली. यंदाच्या निवडणुकीत त्यांना विधानसभेच्या मैदानात उतरविले. कधीकाळी ज्या कुनकरीमधील पडक्या खोलीत राहून त्यांनी शिक्षण घेतले तिथूनच ते आमदार झाले. आणि आज राज्याचे मुख्यमंत्री झाले. साय यांच्या तिन्ही भावांनीही चांगले यश मिळविले.ओमप्रकाश बगियाचे संरपंच झाले. जय प्रकाश मुंबईत भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये इंजिनिअर म्हणून काम करतात तर सर्वात धाकटा विनोद साय रायपूरमध्ये विद्युत विभागात इंजिनिअर आहेत.

Tags

follow us