Download App

BJP Candidate List : प्रज्ञा ठाकूरांचा पत्ता कट, भोपाळमधून कोणाला मिळाली उमेदवारी?

  • Written By: Last Updated:

BJP Candidate List : इंडिया आघाडीत जागावाटपाचा घोळ सुरू असतांनच भाजपने (BJP) उमेदवारांची नावं जाहीर करून रणशिंग फुकलं. भाजपने एकूण 195 उमेदवारांची यादी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची नावे पहिल्या यादीत आहेत. यामध्ये विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर काही जणांचा पत्ता कापण्यात आला. सर्वाधिक चर्चा भोपाळच्या जागेची होती. येथून प्रज्ञा ठाकूर (Pragya Thakur) यांचे तिकीट रद्द करून आलोक शर्मा (Alok Sharma) यांना तिकीट देण्यात आले आहे.

सुषमा स्वराज यांची कन्या लोकसभेच्या रिंगणात, नवी दिल्लीतून उमेदवारी जाहीर 

भारतीय जनता पक्षाची महत्त्वाची पत्रकार परिषद नवी दिल्लीत संध्याकाळी 6 वाजता सुरू झाली. यावेळी भाजप नेते विनोद तावडे यांनी 195 उमेदवारांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत 34 केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर भोपाळमधून खासदार उमेदवार आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांना संधी देण्यात आली होती. मात्र यावेळी त्यांचे नाव या यादीतून काढून टाकण्यात आले.

सर्वांना संपवून भापजलाच जिंवत राहायचं; रामदास कदमांच्या टीकेवर थोरात म्हणाले, ‘हा फक्त ट्रेलर…’ 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मोठ्या मतांनी पराभव केला. त्यावेळी ते 3,64,822 मतांनी विजयी झाले होते. मात्र, त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे त्या कायम वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. दरम्यान, भोपाळ मतदारसंघातून भाजपने नवा उमेदवार उभा केला आहे. प्रज्ञा ठाकूरचे तिकीट रद्द करून त्यांच्य जागी आलोक शर्मा यांना संधी देण्यात आली.

मध्य प्रदेशातील 24 नावांपैकी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विदिशामधून आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना गुनामधून तिकीट मिळाले आहे. प्रतर मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष व्हीडी शर्मा यांना खजुराहोमधून पुन्हा तिकीट मिळाले आहे.

या महिलांना मिळाली संधी
स्मृती इराणी अमेठीतून निवडणूक लढवणार आहेत. डुमरियागंजमधून जगदंबिका पाल, फतेहपूरमधून साध्वी निरंजन ज्योती, मथुरेतून हेमा मालिनी यांना तिकीट देण्यात आलं.

follow us