मोठी बातमी! इंडिया आघाडीतील जागावाटपानंतर AAP ने जाहीर केले उमेदवार
AAP announced candidates for Lok Sabha : आम आदमी पार्टीने (AAP) देशाची राजधानी दिल्लीत लोकसभेच्या 4 जागांसाठी (Lok Sabha 2024) उमेदवार जाहीर केले आहेत. मंगळवारी (27 फेब्रुवारी) करण्यात आलेल्या घोषणेनुसार, नवी दिल्लीत सोमनाथ भारती, दक्षिण दिल्लीत साही राम पहेलवान, पूर्व दिल्लीत कुलदीप कुमार आणि पश्चिम दिल्लीत महाबल मिश्रा यांना संधी देण्यात आली.
AAP Senior Leaders Addressing an Important Press Conference l LIVE https://t.co/Tn9aRQWVCB
— AAP (@AamAadmiParty) February 27, 2024
आप नेते संदीप पाठक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “आप विरोधी पक्ष इंडिया आघाडीचा एक भाग आहे. आम्ही आज 5 उमेदवारांची नावे जाहीर करत आहोत, त्यापैकी 4 दिल्लीचे असतील. आपचे माजी राज्यसभा खासदार आणि हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष सुशील गुप्ता दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील कुरुक्षेत्र येथून निवडणूक लढवणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
‘जरांगेंची SIT चौकशी ‘चिवट’पणे करा’; ‘चिवट’ शब्दावर जोर देत उद्धव ठाकरेंची मागणी…
गोपाल राय म्हणाले की दिल्ली, हरियाणा, गुजरात, पंजाब आणि आसाममध्ये AAP उमेदवार इंडिया आघाडी अंतर्गत उभे राहतील. यापूर्वी आम्ही गुजरातमधील भरूच आणि भावनगरमधील उमेदवार जाहीर केले होते, त्याचप्रमाणे आता आम्ही दिल्लीतून उमेदवार उभे केले आहेत.
अयोध्या आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा
गोपाल राय पुढे म्हणाले,’आप’च्या वाट्याला आलेल्या जागांची सर्व गणिते केल्यानंतर येते की प्रत्येक जागा जिंकणे आवश्यक आहे. आम्ही 10 उमेदवार जाहीर झाले आहेत. पंजाबसाठीही लवकरच उमेदवारांची नावे करणार आहेत.