‘जरांगेंची SIT चौकशी ‘चिवट’पणे करा’; ‘चिवट’ शब्दावर जोर देत उद्धव ठाकरेंची मागणी…
Udhav Thackeray News : मनोज जरांगे यांची एसआटी चौकशी चिवटपणे करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी चिवट शब्दावर जोर देत केली आहे. दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी जरांगेंच्या संपूर्ण आंदोलनाची चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले आहेत. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनीही चिवट चौकशी करण्याची मागणी केली आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
चौथ्या दिवसांत बजेट वसूल, यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ सिनेमानं पार केला इतक्या कोटींचा टप्पा
उद्धव ठाकरे म्हणाले, राज्य सरकारने मनोज जरांगेच्या मागणीच्या मागे लागलं पाहिजे, पण राज्य सरकार मनोज जरांगेच्या मागे लागत आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे आम्ही असल्याचं तुम्ही म्हणता तर मग एक महिन्याआधी गुलाल कोणी उधळला होता, फटाके कोणी फोडले होते. जर तुम्ही आज एसआयटी चौकशी करत असाल तर जरांगेंची एसआयटी चौकशी चिवटपणे करा, काहीच सोडू नका, अशी मागणीच उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
माजी आमदाराच्या हत्येसाठी सिद्धू मुसेवाला पॅटर्न; भाजपच्या माजी आमदाराचा हात !
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचे आणि चिघळलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटत आहे. जरांगे पाटील यांच्या संपूर्ण आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. या प्रकरणावर आता विरोधकही आक्रमक झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांचीच एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे फडणवीसांचीही एसआयटीद्वारे चौकशी व्हायला हवी, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली.
https://www.youtube.com/watch?v=XuLEV9soiF8
नाना पटोले म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांचीच एसआयटी चौकशी केली पाहिजे. तसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने मनोज जरांगे यांच्याबरोबर चर्चा करत होते. त्यांच्यात काय चर्चा होत होती. या चर्चेचा तपशील आता समोर आला पाहिजे, असेही पटोले म्हणाले