Download App

कॉल सेंटर मोहीम अन् मिशन 350 प्लस; 2024 साठी भाजपचा ‘मायक्रो प्लॅन’

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : पुढील वर्षी देशभरात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार असून, विजयाच्या दृष्टीने प्रत्येक पक्षाकडून अगदी सुक्ष्म नियोजन केले जात आहे. निवडणुकांपूर्वीच 2024 मध्ये देशात कमळ फुलेल असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. 350 प्लससाठी भाजपकडून आतापासूनच नियोजन केले जात असून एकहाती विजयासाठी भाजपकडून पक्ष बूथ स्तरावर लक्ष केंद्रित केले जात आहे. तसेच देशाच्या विविध भागात कॉल सेंटर्स उघडून मिशन 350 पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. (BJP Starts 2024 Micro Planning For Loksabha Election)

‘CM शिंदेंची इतिहासात लाचार अन् गुडघे टेकणारे मुख्यमंत्री म्हणून नोंद होणार’

मंगळवारी (दि. 29) भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेऊन निवडणूक लढाई जिंकण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग केले. यात देशभरात कॉल सेंटर सुरू करून मतदारांपर्यंत पोहोचण्याची योजना आखण्यात आली आहे, तर नगर पंचायत अध्यक्ष आणि नगराध्यक्षांच्या परिषदा सुरू करण्याची रणनीती आखण्यात आली आहे.

भाजपने 2023 मध्ये राज्यांमध्ये सत्तेवर येण्यासाठी आणि 2024 मध्ये 350 पेक्षा जास्त जागा जिंकण्याची ब्लू प्रिंट तयार केली आहे. पार पडलेल्या या मॅरेथॉन बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुका तसेच 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या कार्यक्रमांची रूपरेषाही ठरविण्यात आली आहे. त्यामुळे भाजप पूर्णपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.

Chandrayaan 3 : चांद्रयान-3 ने शोधला खजिना! चंद्रावर ऑक्सिजन, सल्फर आढळलं

शहरी मते काबीज करण्याचा भाजपचा डाव

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ग्रामीण मतांचे शहरी मतांमध्ये रूपांतर करण्याची योजना आखली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातील जिल्हा पंचायत अध्यक्षांना निवडणूक व्यवस्थापनात तज्ज्ञ असलेल्या भाजप नेत्यांकडून ग्रामीण भागातील मतदारांना कशी मदत करावी याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

शहरी मतांवर आपली पकड कायम ठेवण्यासाठी स्थानिक नागरी संस्थांच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्याची सविस्तर रणनीती या बैठकीत आखण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी ब्लॉक प्रमुख आणि बीडीसींना प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्रमाचा अहवाल सादर केल्याचेही सांगितले जात आहे. यासोबतच जिल्हा पंचायत सदस्यांच्या प्रशिक्षण वर्गाचा अहवाल सादर करून ब्लॉक पंचायत स्तरावरील सदस्यांच्या प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले.

भाजपने शड्डू ठोकला! विरोधकांना आस्मान दाखवण्यासाठी नेमणार एक लाख वॉरियर्सची टीम

मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा मोठा प्लॅन

या बैठकीत जेपी नड्डा यांनी 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी 15 दिवस देशभर सेवा कार्य करण्याच्या योजनेवर चर्चा केली. ज्यात मोदींच्या वाढदिवसानिमित्त पक्षाकडून सेवा कल्याण कार्यांच्या माध्यमातून कार्यक्रम राबविला जाणार आहे. यासाठी पक्ष लवकरच परिपत्रक जारी केले जाणार आहे.

देशभरात कॉल सेंटर उघडणार
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात कॉल सेंटर सुरू करण्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. कॉल सेंटरच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या विस्तृत योजनेवर सखोल चर्चा करण्यात आली. देशभरात सुरू होणारी कॉल सेंटर्स आणि त्यांच्या कामकाजाबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते लवकरच ब्लू प्रिंट तयार करून त्याची अंमलबजावणी करणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी देशात कॉल सेंटर उघडण्यासाठी भाजप लवकरच एक मोठी बैठक घेणार आहे.

Tags

follow us