Download App

BJP MLA T Raja Singh : मोठी बातमी! भाजप आमदार टी.राजा यांना अटक

BJP MLA T Raja Singh : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, सोशल मीडियावर नेहमी काहींना काही कारणाने चर्चेत राहणारे तेलंगणामधील

  • Written By: Last Updated:

BJP MLA T Raja Singh : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, सोशल मीडियावर नेहमी काहींना काही कारणाने चर्चेत राहणारे तेलंगणामधील गोशामहलचे भाजप (BJP) आमदार टी राजा सिंह (T Raja Singh) यांना पोलिसांनी शमशाबाद विमानतळावरून ताब्यात घेतले आहे.

माहितीनुसार, टी राजा मेडककडे (Medak) जात होते मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. गोरक्षणाच्या मुद्द्यावरून गुंडांनी हल्ला केलेल्या पक्षाच्या राज्य युनिटला भेटण्यासाठी टी राजा मेडककडे होते. याची माहिती सोशल मीडियावर स्वतः राजा सिंहने दिली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, गुंडांनी हल्ला केलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मेडकला जात असताना तेलंगणा पोलिसांनी विमानतळावर अटक केली.

तर त्यापूर्वी एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की, काल मेडक येथे काही गुंडांनी गौ रक्षकांवर ते गौ रक्षा करत असताना त्यांच्यावर हल्ला केला. मेडक पोलिसांनी हल्लेखोरांना एकतर्फी पाठबळ दिले आहे. हल्लेखोर खुलेआम फिरत असताना भाजप आणि बीजेवायएमच्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. आज मी रूग्णालयात जाऊन गुंडांनी हल्ला करून जखमी झालेल्या गौ रक्षकांना भेटणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी (15 जून) ला तेलंगणातील मेधक जिल्ह्यात गायींच्या कथित अवैध वाहतुकीवरून दोन समुदायांमध्ये वाद निर्माण झाला होता त्यामुळे पोलिसांनी मेधक जिल्ह्यातील रामदास चौरस्त्याजवळ कलम 144 लागू केले आहे.

या प्रकरणात माहिती देताना मेडकचे ​​पोलिस अधीक्षक बी बाळा स्वामी म्हणाले की, पोलिसांनी परिसरात कलम 144 लागू केले आहे आणि परिस्थिती आता नियंत्रणात आहे. काही जणांना अटक करण्यात आली असून दोन्ही पक्षाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे आणि पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. असं मेडकचे ​​पोलिस अधीक्षक बी बाळा स्वामी म्हणाले.

पोलिस अधीक्षक बी बाळा स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गायींच्या कथित अवैध वाहतुक बंद केल्याने दोन समुदायांमध्ये वाद निर्माण झाला होता.

पोलीस भरती मैदानी प्रक्रिया पुढे ढकला… खासदार लंकेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

या प्रकरणात दोन जण जखमी झाले आहे. सध्या जखमींवर उपचार सुरू आहे मात्र ज्या रुग्णालयात जखमींवर उपचार होत आहे त्या रुग्णालयावर देखील हल्ला करण्यात आला आहे.

follow us

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज