नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. मात्र त्यापूर्वीच भाजपच्या (BJP) 12 खासदारांसाठी हे अधिवेशन शेवटचे ठरले आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या भाजपच्या 12 खासदारांनी राजीनामा दिला आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या भेटीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
मध्यप्रदेशमधून नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल, राकेश सिंग, उदय प्रताप आणि रिती पाठक या खासदारांनी त्यांचा राजीनामा दिला. याशिवाय छत्तीसगडमधील भाजप खासदार रेणुका सिंह, अरुण साव आणि गोमती साई, तर राजस्थानमधील भाजपचे खासदार बालकनाथ, राज्यवर्धन सिंह राठोड, दिया कुमारी आणि किरोडी लाल मीना या खासदारांनी त्यांच्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. (BJP MPs who won the State Assembly elections resign from their Membership of the Parliament)
राजीनामा देणाऱ्यांमध्ये नरेंद्रसिंह तोमर हे केंद्रीय कृषी मंत्री आहेत. तर प्रल्हाद सिंह पटेल हे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री आहेत. याशिवाय रेणुका सिंह या केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री आहेत. आता खासदारकीचा राजीनामा दिल्याने त्यांना मंत्रिपदाचाही राजीनामा द्यावा लागणार आहे. यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात तीन मंत्री कमी होणार आहेत.
All 10 BJP MPs who won the State Assembly elections resign from their Membership of the Parliament. It was decided after the meeting with JP Nadda and Prime Minister.
These MPs are Narendra Singh Tomar, Prahlad Singh Patel, Rakesh Singh, Uday Pratap and Riti Pathak – from…
— ANI (@ANI) December 6, 2023
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने सरकार स्थापन केले आहे. तर तेलंगणात आठ आणि मिझोराममध्ये दोन जागा जिंकल्या आहेत. या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने 21 खासदारांना तिकीट दिले होते. यात राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी सात खासदारांनी निवडणूक लढवली होती. तर छत्तीसगडमध्ये चार आणि तेलंगणातील तीन खासदारांना विधानसभेची तिकिटे देण्यात आली होती.
आता या निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या 12 खासदारांना भाजप हायकमांडने लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर नड्डा यांच्यासह सर्व सदस्य राजीनामा देण्यासाठी सभापतींना भेटायला गेले. सभापतींनीही या खासदारांचा राजीनामा स्वीकारला आहे.