BJP’s New slogan : लोकसभा निवडणुका आता उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांसाठी देशातील सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. दिल्लीत भाजपकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. लोकसभेसाठी भाजपकडून (BJP) उमेदवारांची यादी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर लगेचच आगामी निवडणुकांसाठी भाजपकडून नव्या नाऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. हा नारा विरोधकांच्या मनाला ठेस पोहोचवणाराच असल्याचं दिसून येत आहेत. ‘सपने नहीं हकीकत बुनते हैं, इसलिए तो सब मोदी को चुनते हैं’ या नवीन नाऱ्याची घोषणा करण्यात भाजपकडून करण्यात आलीयं.
शिवसेनेच्या शिलेदाराविरोधात तटकरे, भाजपची मोर्चेबांधणी : कोंडी फोडण्याचे CM शिंदेंपुढे आव्हान
लोकसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय बैठक दिल्लीत सुरू होत असतानाच भाजपकडून हा नारा जाहीर करण्यात आला आहे. या बैठकीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Pm Narendra Modi) राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा (J.P. Nadda) यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच भाजप आपल्या उमेदवारांची घोषणा करणार आहे.
मोठी बातमी! हायकोर्टाचा मराठा समाजाला दिलासा, EWS मधून नियुक्त्या मिळण्याचा मार्ग मोकळा
लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. या बैठकीत विकास भारत संकल्प अभियानासोबतच छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोरामच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरही चर्चा होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
संसदेत घुसखोरीवेळी भाजप खासदार पळून गेले; गौप्यस्फोट करत Rahul Gandhi मीडियावर भडकले
राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या हिंदी बेल्टमधील राज्यांमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला आहे. तेलंगणात काँग्रेसला सत्ता मिळाली आहे. हिंदी बेल्टमधील राज्यांत भाजपची स्थिती मजबूत असल्याचे मानले जाते. त्याचवेळी पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून विधानसभा निवडणुकीकडे पाहिले जात होते. तर दुसरीकडे इंडिया आघाडीकडून अद्याप संयोजक, जागावाटपावर कोणतीही चर्चा झालेली नाही.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने सार्वत्रिक निवडणुकीत स्वबळावर सलग दोनदा बहुमत मिळवले आहे. 2014 साली भाजपकडून ‘अच्छे दिन आने वाले है’ ‘अब की बार मोदी सरकार’चा नारा देण्यात आला होता. तर 2019 मध्ये भाजपने पुन्हा एकदा मोदी सरकार असा नारा दिला, यावेळी भाजपकडून ‘सपने नहीं हकीकत बुनते हैं, इसलिए तो सब मोदी को चुनते हैं’ असा नारा देण्यात आला आहे.