Download App

राजस्थान विधानसभा निवडणुकासाठी भाजपची दुसरी यादी जाहीर, वसुंधरा राजेंसह 83 उमेदवारांना तिकीट

  • Written By: Last Updated:

Rajasthan BJP Candidate List: काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभेच्या निवडणूकांच्या तारखांची घोषणा केली. निवडणुकांची घोषणा होताच भाजपने (BJP) राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. तर आज दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 83 उमेदवारांची नावे आहेत. वसुंधरा राजे यांना झालरापाटनचे तिकीट देण्यात आले आहे.

रोहित पवार लोकसभा लढणार…तर जास्त तयारी करावी लागेल, विखेंचा मिश्किल टोला 

नवी दिल्ली येथे २० ऑक्टोबरला पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा हजर होते. या बैठकीत उमेदवारांबाबत निर्णय घेण्यात आला. ही बैठक सुमारे दीड तास चालली.

वसुंधरा राजे यांना झालरापाटनचे तिकीट देण्यात आले आहे. ज्योती मिर्धा यांना नागौर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून त्यांनी नुकतेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर सतीश पुनिया यांना अंबर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.तर पक्षाने विरोधी पक्षनेते राजेंद्रसिंह राठोड यांची जागा बदलली आहे. चुरूऐवजी तारा नगर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या विधानसभा निवडणुकीत 2 विद्यमान आमदारांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत. पक्षाने चितोडचे आमदार चंद्रभान सिंह आणि सांगानेर मतदार संघाचे आमदार अशोक लाहौती यांचे तिकीट कापले. चंद्रभान सिंह यांच्या जागी भैरो सिंह शेखावत यांचे जावई नरपत सिंह राजवी यांना चित्तोडमधून तिकीट देण्यात आले होते, तर भाजपचे प्रदेश सरचिटणीस भजनलाल शर्मा यांना सांगानेरमधून तिकीट देण्यात आले.

भाजपने दुसऱ्या यादीत 10 महिलांचा समावेश केला आहे. तर अनुसूचित जातीचे 15 आणि अनुसूचित जमातीचे 10 उमेदवार आहेत. त्याचबरोबर वसुंधरा राजे यांच्या अनेक समर्थक नेत्यांनाही यात स्थान मिळाले आङे. त्यात प्रताप सिंग सिंघवी, अशोक डोगरा, नरपत सिंग राजवी, श्रीचंद कृपलानी, कालीचरण सराफ, कैलाश वर्मा, सिद्धी कुमारी, हेम सिंग भडाना, अनित भदेल, कन्हैला लाल यांचा यांच्या नावाचा समावेश आहे.

पहिल्या यादीत भाजप खासदारांना दिले तिकीट
राजस्थानची पहिली यादी जाहीर झाले तेव्हा भाजपने सात खासदारांना विधानसभेचे तिकीट दिले. त्यात भाजप खासदार राजवर्धन सिंह राठोड जोतवाडामधून, दिया कुमारी विद्याधर नगरमधून, बाबा बालकनाथ तिजारामधून, हंसराज मीना सपोत्रामधून आणि किरोरी लाल मीना सवाई माधोपूरमधून, नरेंद्र कुमार मांडवामधून आणि देवी पटेल संचोरमधून निवडणूक लढवणार आहेत.

follow us