Boeing Company Lays Off 180 Employees From India : अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोईंगने जागतिक स्तरावर कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची योजना आखली आहे. याअंतर्गत, कंपनीने बेंगळुरूमधील त्यांच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञान केंद्रातील 180 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता (Boeing Company Lays Off) दाखवला आहे. माहितीनुसार, जागतिक स्तरावर अनेक आव्हानांना तोंड देत असलेल्या बोईंगचे भारतात सुमारे 7,000 कर्मचारी आहेत. कंपनीसाठी भारत (Bengaluru Centre) ही एक प्रमुख बाजारपेठ आहे.
गेल्या वर्षी, बोईंगने जागतिक स्तरावर त्यांच्या सुमारे १० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली होती. जागतिक स्तरावरील कर्मचारी कपात मोहिमेचा एक भाग म्हणून, बोईंगने 2024 च्या डिसेंबर तिमाहीत बेंगळुरू येथील त्यांच्या बोईंग इंडिया इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी सेंटरमधील 180 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले असल्याची माहिती मिळतेय. या संदर्भात बोईंगकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
‘सदस्य संख्या कमी झाल्यास…विश्रांती’, अजित पवारांची पक्षातील नेत्यांना तंबी, आगामी निवडणुका…
या कपातीचा परिणाम ग्राहकांसोबतच्या आणि सरकारसोबतच्या कामकाजावर होणार नाही, याची खात्री करण्यासाठी कंपनी प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे लक्षात घेता, कंपनीने धोरणात्मक बदल केले आहेत. यामुळे मर्यादित संख्येच्या पदांवर परिणाम झाला आहे. बेंगळुरू आणि चेन्नई येथील बोईंग इंडिया इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सेंटर्स जटिल प्रगत एव्हियोनिक्सचे काम करतात.
बेंगळुरू अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान कॅम्पस हा अमेरिकेबाहेर कंपनीच्या सर्वात मोठ्या गुंतवणुकींपैकी एक आहे. कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, भारतात बोईंग दरवर्षी 300 हून अधिक पुरवठादारांकडून सुमारे 1.25 अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तू खरेदी करते.
तरूणाई गुन्हेगारीकडे वळतेय…आम्ही राजकीय लोकं भर घालतोय; दिलीप वळसे पाटलांची कबुली
बोईंग ही जगातील सर्वात मोठ्या एरोस्पेस आणि संरक्षण तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे. बोईंग ही अमेरिकेची सर्वात मोठी निर्यातदार कंपनी आहे ज्याचा व्यवसाय जगातील 150 देशांमध्ये पसरलेला आहे. या कंपनीसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. 2021 मध्ये त्याची विक्री 62.3 अब्ज डॉलर्स होती आणि फॉर्च्यून 500 यादीत ती 54 व्या क्रमांकावर होती. अलिकडच्या वर्षांत, 737 मॅक्स अपघात (2018-2019) आणि उत्पादन विलंब यासारख्या समस्यांमुळे त्यांच्या व्यवसायावर आणि प्रतिष्ठेवर परिणाम झाला आहे.