Download App

Pakistani Ranger : बीएसएफची मोठी कारवाई, राजस्थान सीमेवर पाकिस्तानी रेंजर ताब्यात

Pakistani Ranger : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, बीएसएफने राजस्थान सीमेवर मोठी करावाई करत पाकिस्तानी रेंजर ताब्यात घेण्यात

Pakistani Ranger : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, बीएसएफने (BSF) राजस्थान सीमेवर मोठी करावाई करत पाकिस्तानी रेंजरला  ताब्यात घेतले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) तणाव वाढला असून भारत पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

तर दुसरीकडे 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर 23 एप्रिल रोजी पाकिस्तानी सैनिकांनी चुकून सीमा ओलांडणाऱ्या बीएसएफ जवानाला पकडले होते. तेव्हापासून तो सैनिक पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात आहे. तर आता बीएसएफने देखील राजस्थानच्या सीमेवर मोठी कारवाई करत पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, बीएसएफच्या राजस्थान फ्रंटियरने पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतले आहे. 23 एप्रिल रोजी चुकून बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ ने सीमा ओलांडली होती. त्यानंतर पाकिस्तानी सैन्यकडून शॉ ला ताब्यात घेण्यात आले होते. या घटनेचा भारतीय सैन्यानेकडून विरोध करण्यात आले होते मात्र तरीही देखील पाकिस्तानने जवान पूर्णम कुमार शॉ ला देण्यास नकार दिला होता.

इतिहासात पहिल्यांदाच जेलमध्ये मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा, ‘पी.एस.आय.अर्जुन’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

तर दुसरीकडे 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यापाठीमागे पाकिस्तानचा हात असल्याची माहिती भारत सरकारला मिळाली असल्याने भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भारताने पाकिस्तानसोबत असणारा सिंधू जल करार देखील रद्द केला आहे. याच बरोबर आता पाकिस्तानमधून येणारे सर्व पोस्टल आणि पार्सलवर बंदी घातली आहे. तर दुसरीकडे सराकारने देशात असणारे सर्व पाकिस्तानी नागरिकांना देशातून बाहेर काढले आहे.

follow us