Download App

मायावतींची मोठी घोषणा! पुन्हा आकाश आनंद यांना घोषित केलं उत्तराधिकारी, राष्ट्रीय संयोजक बनवलं

मायावती (Mayawati) यांनी रविवारी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या भाचे आकाश आनंद यांनाच उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे.

  • Written By: Last Updated:

Akash Anand : उत्तर प्रदेशच्या राजकारणात (Politics of Uttar Pradesh) पुन्हा ट्विस्ट आला आहे. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावत (Mayawati) यांनी रविवारी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पुन्हा एकदा आपले भाचे आकाश आनंद यांनाच उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे. तसेच मायावतींनी आकाश आनंद (Akash Anand) यांची राष्ट्रीय संयोजनपदी निवड केली. पक्षाच्या बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली.

NEET Exam: पेपरफुटी प्रकरणी सीबीआय अॅक्शन मोडमध्ये; पहिला गुन्हा दाखल 

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मायावतींनी राष्ट्रीय कार्यकारिणीची पहिली बैठक बोलावली होती. यावेळी मायावतींनी पुन्हा एकदा भाचे आकाश आनंद यांच्यावर विश्वास दाखवला. आकाश आनंद यांना उत्तराधिकारी घोषित करून त्यांचं पुन्हा एकदा मायवतींनी रिलॉंचिंग केलं. उत्तराधिकारी म्हणून आकाश आनंद यांचं नाव घोषित होताच त्यांनी मायावतींच्या पायाला स्पर्श केला. यावेळी मायावतींनी त्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांना आशीर्वाद दिला.

विमानतळं वाढली, प्रवासी वाढले; भारत ठरला तिसरा सर्वात मोठा विमान बाजार 

दरम्यान, याआधीही मायावतींनी त्यांना आपला उत्तराधिकारी घोषित केले होते. मात्र, कोणतेही कारण न देता त्यांना पदावरून हटवण्यात आलं होतं. मात्र, विधानसभेची पोटनिवडणूका डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी पुन्हा एकदा संधी देण्यात आली.

आकाश आनंद स्टार प्रचारकांच्या यादीत…
बसपाने 20 जणांना स्टार प्रचारक म्हणून देखील नियुक्त केलंय लोकसभा निवडणुकीदरम्यान आकाश आनंद यांनी उत्तर प्रदेशात सर्वाधिक सभा घेतल्या. पण, सीतापूर येथील सभेत बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यामुळे मायावतींनी त्यांच्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घातली होती. दरम्यान, आता मायावतींनी आकाश आनंद यांना पंजाब आणि उत्तराखंड विधानसभा पोटनिवडणुकांसाठी स्टार प्रचारक म्हणून घोषित केलं आहे. स्टार प्रमोटर्सच्या यादीत आकाश आनंद दुसऱ्या स्थानावर आहे.

दरम्यान, पक्षाच्या या बैठकीला बिहार बसपा प्रभारी व समन्वयक डॉ.लालजी मेधनकर यांनीही बैठकीला उपस्थिती लावली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आता आम्ही पोटनिवडणूकही लढवू, असे मायावतींनी सांगितले आहे. आम्ही केवळ यूपीमध्येच नाही तर देशात जिथे जिथे मजबूत आहोत, तिथे निवडणूक लढवू.

follow us

वेब स्टोरीज