विमानतळं वाढली, प्रवासी वाढले; भारत ठरला तिसरा सर्वात मोठा विमान बाजार
Airline Market : मागील दशकात विमान वाहतूक क्षेत्रात मोठी वाढ (Airline Market) झाल्याने भारत आता जगातील तिसरा सर्वात मोठा बाजार बनला आहे. भारत जगातील तिसरा सर्वात मोठा विमान बाजार बनला आहे. दहा वर्षांपूर्वी साठ लाख प्रवासी संख्येसह भारत पाचव्या क्रमांकावर होता. चौथ्या क्रमांकावर इंडोनेशिया आणि तिसऱ्या क्रमांकावर ब्राझील होता. तर अमेरिका पहिल्या आणि चीन दुसऱ्या क्रमांकावर होता. ओएजी डेटानुसार भारत एप्रिल 2024 मध्ये 1.56 कोटी प्रवासी एअरलाईन क्षमतेसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या पाच घरगुती बाजारात भारत सर्वाधिक वेगाने वाढणारा बाजार आहे. 2014 ते 2024 या दहा वर्षांच्या काळात 6.9 टक्के क्षमता वृद्धीसह भारत आघाडीवर राहिला.
वार्षिक 6.3 टक्के वाढीसह चीन खूप जवळ होता. तर अमेरिका आणि इंडोनेशियात वाढीचा दर अतिशय कमी राहिला. रिपोर्टनुसार मागील दहा वर्षांदरम्यान इंडिगो कंपनीने मार्केटमधील हिस्सेदारी 62 टक्के झाली आहे. 2014 मध्ये हे प्रमाण 32 टक्के इतके होते. सरकारने दिलेल्या माहितीनुसार मागील दहा वर्षांच्या काळात देशात विमानतळाची संख्या 74 वरून 157 इतकी झाली आहे. सन 2023 मध्ये 91 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांनी डीजी यात्रा सुविधेचा लाभ घेतला. तर 35 लाखांपेक्षा जास्त प्रवशांनी ॲप डाऊनलोड केले.
Air India च्या फ्लाईटमध्ये तुम्ही पण जेवण मागवताय? तर सावधान..मिलमध्ये आढळलं धारदार ‘ब्लेड’
अहवालात असेही म्हटले आहे की कमी किमतीच्या वाहक क्षमतेचा (LCC) मोठ्या देशांतर्गत विमान बाजारपेठेत महत्वाची भूमिका बजावतो. एप्रिल 2024 मध्ये देशांतर्गत विमान बाजारपेठेत एलसीसीचा वाटा 78.4 टक्के होता. जो पाच प्रमुख बाजारपेठांमध्ये सर्वाधिक आहे. मागील दहा वर्षात इंडिगोने 13.9 टक्के वाढीसह आपला बाजारातील हिस्सा 62 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. 2014 मध्ये कंपनीचा बाजारातील हिस्सा 32 टक्के होता. मात्र अन्य कोणत्याही विमान कंपनीच्या बाजारातील हिश्श्यात फार वाढ झालेली नाही.
केंद्र सरकारने विमान वाहतूक क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे मागील दहा वर्षात देशातील विमानतळाची संख्या 74 वरून 157 पर्यंत पोहोचली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 19 नोव्हेंबर रोजी देशात विक्रमी 4 लाख 56 हजार 910 प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास केला. कोरोना संकटाच्या कलआधीच्या सरासरीपेक्षा 7.4 टक्के आधिक आहे. सध्या फक्त चीन आणि अमेरिकेची एअर लाईन बाजारपेठ भारताच्या पुढे आहे.
Air India Express Strike : ..म्हणून एअर इंडियाचे कर्मचारी टाटांच्या विरोधात घेत आहेत सामूहिक रजा