Download App

बसपाचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची हत्या, 8 संशयितांना अटक; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के. आर्मस्ट्राँग (K. Armstrong) यांची शुक्रवारी (ता. 5) हत्या करण्यात आली.

K. Armstrong : तामिळनाडूतील बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के. आर्मस्ट्राँग (K. Armstrong) यांची शुक्रवारी (ता. 5) हत्या करण्यात आली. चेन्नईतील पेरांबूर येथील घराबाहेर ते काही कार्यकर्त्यांशी बोलत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या 6 जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असून या घटनेने देशात खळबळ उडाली आहे.

जानकरांनी वाढवली महायुतीची चिंता, रासपचा विधानसभेच्या 104 जागांवर दावा

आर्मस्ट्राँग यांच्यावर चाकू आणि तलवारीने हल्ला करून हल्लेखोर पळून गेले. त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आर्मस्ट्राँग यांच्या निर्घृण हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, के. आर्मस्ट्राँगच्या हत्येप्रकरणी चेन्न पोलिसांनी आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

मोठी बातमी! सरकार लवकरच सगेसोयऱ्याचा अध्यादेश काढणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती 

अतिरिक्त पोलिस आयुक्त गर्ग यांनी या हत्येबाबत बोलतांना सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी 10 पथके तयार केली आहेत. ते म्हणाले, आम्ही आतापर्यंत आठ संशयितांना अटक केली आहे. हा प्राथमिक तपास आहे. संशयितांची चौकशी सुरू आहे. या हत्येमागे 2-3 संशयास्पद हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या हत्येबद्दल व्यक्त केला. स्टॅलिन म्हणाले की, पोलिसांना या प्रकरणाचा त्वरीत तपास करण्याचे आणि कायद्यानुसार दोषींना न्याय देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तर बसपाच्या सुप्रीमो मायावती यांनीही आर्मस्ट्राँग यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला. के आर्मस्ट्राँग यांची चेन्नईच्या घराबाहेर झालेली निर्घृण हत्या अत्यंत दुःखद आणि अत्यंत निषेधार्ह आहे. आर्मस्ट्राँग यांचे कुटुंबीय, नातेवाईकांप्रती माझ्या संवेदना… व्यवसायाने वकील असलेले आर्मस्ट्राँग हे राज्यातील दलितांचा खंबीर आवाज म्हणून ओळखले जात होते. सरकारने तातडीने दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मायावतींनी केली. आर्मस्ट्राँग यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी सपा सुप्रीमो उद्या ( 7 जुलै ) तामिळनाडूला जाणार आहेत.

तर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी त्यांच्या हत्येचा निषेध केला आणि राज्य सरकार दोषींना त्वरीत न्याय मिळवून देईल, असे आश्वासन दिले. के आर्मस्ट्राँग यांची राहुल गांधींनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत लिहिलं की, बहुजन समाज पार्टीचे (बीएसपी) अध्यक्ष के आर्मस्ट्राँग यांची क्रुर आणि निर्घृण हत्येच्या घटनेने दुख झाले. त्यांच्या कुटुंबीय, मित्रांप्रती माझ्या संवेदना, अशी पोस्ट राहुल गांधींनी केली.

उच्चस्तरीय चौकशी करा

तर खासदार चंद्रशेखर आझाद यांनी के आर्मस्ट्राँग यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आणि या हिंसक हल्ल्याचा तीव्र निषेध केला. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

follow us