Download App

Budget 2024 : यंदाच्या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला पाच अपेक्षा; सर्वांच्या नजरा खिळल्या…

Budget 2024 : आगामी लोकसभा उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या असतानाच आता केंद्र सरकारकडून येत्या 1 फेब्रूवारीला यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Seetaraman) संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निवडणुकीचं वर्ष असल्याने सरकारचा हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे. या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना यंदाच्या अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा असणार आहेत. त्यामुळे आता सरकारकडून अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा केल्या जाणार? याकडं सर्वांचच लक्ष लागलयं.

अयोध्येतील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जमीन अदानी समुहाला विकली? भाजप नेत्याच्या कंपनीचे कनेक्शन उघड

सर्वसामान्य नागरिकांनी जरीही अनेक अपेक्षा ठेवल्या असतील तरीही सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करणार नसल्याचं मत तज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे. देशात मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह नोकरदार वर्गाकडून मोठ्या अपेक्षा ठेवण्यात आल्या आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत नोकरदार वर्गाचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळेच नोकरदारांनी यंदाच्या अर्थसंकल्पातून पाच अपेक्षा ठेवल्या आहेत.

Bade Miyan Chote Miyan चा धडाकेबाज टीझर रिलीज; टायगर-अक्षयच्या ॲक्शनने चाहते थक्क

नोकरदार लोकांच्या काय अपेक्षा आहेत?
नोकरदारवर्ग कराच्या जुन्या आणि नव्या पद्धतीत अडकल्याने बाहेर पडण्यासाठी करप्रणालीत एकच स्लॅब ठेवण्याची अपेक्षा.
अर्थसंकल्पात पीपीएफची मर्यादा आणि व्याजदर वाढवण्याची अपेक्षा.
कलम 80C आणि 80D अंतर्गत कपातीची मर्यादा वाढवली जाईल.
सरकारने स्टँडर्ड डिडक्शन टॅक्स वाढवण्यावर भर दिला पाहिजे.
स्टँडर्ड डिडक्शन 50 हजारांवरून 90 हजार रुपयांपर्यंत वाढवावा.
कराचं ओझं हलकं करण्यासाठी एकच स्लॅब आकारावं.

दरम्यान, अर्थशास्त्रज्ञांच्या मते यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारकडून सर्वसामान्यांचा हिताचा कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही. यंदा सरकार निर्णय घेण्याच अनूकूल नसून अर्थमंत्री निर्मला सितारमण करासंदर्भात कोणतीही मोठी गोषणा करणार नाहीत, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

follow us