अयोध्येतील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जमीन अदानी समुहाला विकली? भाजप नेत्याच्या कंपनीचे कनेक्शन उघड

अयोध्येतील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जमीन अदानी समुहाला विकली? भाजप नेत्याच्या कंपनीचे कनेक्शन उघड

Ayodhya Bjp leaders Sold Ecologically Sensitive land : अयोध्येत नूकताच राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्याआधीच अयोध्येत पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेली जमीन भाजपच्या नेत्यांनी अदानी समूहासोबत विकल्याची माहिती समोर आलीयं. यासंदर्भात स्क्रॉल डॉट इन वेबसाईटने माहिती दिलीयं. या रिपोर्टनूसार भाजपच्या नेत्यांनी संगनमताने राम मंदिराच्या जवळच असलेल्या या जमीनीचा व्यवहार केला असल्याचंही उघड झालं आहे.

Budget 2024 : ‘स्टार्टअप’ कंपन्यांना मिळणार ‘बूस्टर’? ‘या’ आहेत महत्वाच्या मागण्या

स्क्रॉलचे आयुष तिवारी यांच्या रिपोर्टनूसार टाईम सिटी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नावे एका संस्थेने शरयू नदीजवळील जमीन 1.13 कोटी रुपयांना खरेदी केली होती. ही खरेदी ऑक्टोबर आणि डिसेंबर 2023 मध्ये झालीयं. त्यानंतर ही जमीन अदानी समूहाला तीन पट अधिक किंमतीवर विकण्यात आल्याचं समोर आलं आहे. अदानी समूहाला 3.57 कोटी रुपयांनी ही जमीन विकण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

टाईम सिटी सहारा समूहाचे माजी अकाऊटंट चंद्र प्रकाश शुक्ला यांनी स्थापन केली. शुक्ला हे भाजपात सामिल झाले त्यानंतर 2017 ते 2022 काळात ते कप्तानगंज मतदारसंघाचे आमदार होते. हा समूह शुल्का यांचे माजी व्यावसायिक सहकारी पंकज पाठक यांच्यामार्फत चालवला जात होता. पंकज पाठकदेखील भाजपचा सदस्य असून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जवळचे संबंध आहेत.

दोन गटांत तुफान राडा, सरकार अॅक्शन मोडमध्ये; मीरा रोडच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर

जमीनीच्या व्यवहारामध्ये शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात जमीनी विकल्या असून या जमिनींचा व्यवहार अनेक प्रश्न उपस्थित करीत आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये टाईम सिटीने माझा जमथरामध्ये एक हेक्टर जमीन खरेदी केली. ही जमीन घनसीरा आणि कबूतरा देवी यादव यांची होती. माझा जमथरामधील जी जमीन अदानी समुहाला विकण्यात आली ही जमीन शरयू नदीजवळ असून पर्यावरणाच्या दृष्टीने जमीन संवेदनशील असल्याचं सांगण्यात आलं आहे. 2022 साली सरकारने या जमीनीवर बांधकामांवर बंदी घालण्यात आली होती.

माझा जमथरा फैजाबाद, अयोध्या आणि शरयू नदीमद्ये एक मोठी जमीन अस्तित्वात असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे. या जागेपासून जवळपास 5 किमी अंतरावर बाबरी मस्जिद होती आणि आता राम मंदिर तयार होत आहे. स्क्रोलच्या प्रश्नांना उत्तर देताना, अदानी समूहाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘हा व्यवहार पूर्णपणे कायदेशीर असून नियमांनुसार केला गेला आहे. कंपनीने सध्याच्या दराने जमीन खरेदी केली आहे.

फेब्रुवारी २०२१ मध्ये यादव कुटुंबाने कानपूरच्या सुधा दीक्षित यांना 33.53 लाख रुपयांना 56 हेक्टर वारसाहक्काची जमीन विकली. ही रक्कम जमिनीच्या सर्कल दरापेक्षाखूपच कमी आहे, ही रक्कम त्यावेळची 77.46 लाख रुपये होती, असं स्क्रोलच्या तपासात पुढे असे आढळून आले आहे. या दोन्ही व्यवहारांमध्ये साक्षीदार सूर्यभान सिंग होता, सिंग हा टाइम सिटीचा कायदेशीर सल्लागार आहे. दोन वर्षांनंतर, दीक्षितने ही मालमत्ता टाईम सिटीला 40 लाख रुपयांना विकली. जयभान सिंग आणि अविनाश सिंग हे दोघेही व्यवहारातील साक्षीदार होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये यादव कुटुंबाने 0.44 हेक्टरचा दुसरा भूखंड थेट टाइम सिटीला 33 लाख रुपयांना विकला. यावेळीही सर्कल किमतीपेक्षा खूपच कमी किमतीत हा व्यवहार झाला आणि या व्यवहाराचे साक्षीदार अविनाश सिंग आणि सीताराम यादव होते.

दरम्यान, या तिन्ही व्यवहारातील जवळपास सर्वच साक्षीदार भाजपच्या स्थानिक नेत्यांशी जोडलेले आहेत. सूर्यभान आणि जयभान हे भाजपचे कार्यकर्ते आणि अयोध्या जिल्हा पंचायत सदस्य चंद्रभान सिंह यांचे भाऊ आहेत. अविनाश हा चंद्रभानचा मुलगा. सीताराम यादव हे फैजाबाद येथील अमानीगंज येथील भाजप नगरसेविका सुमन यादव यांचे सासरे आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube