Budget 2024 Gas Cylinder Price : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज अर्थसंकल्प सादर (Budget 2024) करणार आहेत. देशाचे लक्ष या बजेटकडे लागलेले असतानाच तेल कंपन्यांनी मात्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी जोरदार झटका (LPG Price Hike) दिला आहे. आज भारतीय तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या (Commercial Gas Cylinder) दरात वाढ केली आहे. घरगुती गॅसचे दर मात्र वाढवले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा कायम राहिला आहे. अर्थसंकल्प सादर होण्याच्या काही तास अगोदरच ही दरवाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसचे दर निश्चित करत असतात. त्यानुसार आज गॅसच्या दरात वाढ झाली आहे.
LPG Price : गुडन्यूज! नववर्षाआधीच LPG गॅसच्या दरात मोठ्ठी कपात; व्यावसायिकांना दिलासा
तेल कंपन्यांनी आज व्यावसायिक गॅसच्या दरात 14 रुपये वाढ केली आहे. त्यामुळे या गॅसचे दर आता 1769.50 रुपये प्रति सिलेंडर असे झाले आहेत. याआधी डिसेंबर महिन्यात व्यावसायिक गॅसचे दर 30 रुपयांनी कमी करण्यात आले होते. तर मागील जानेवारी महिन्यात 2 रुपये कपात करण्यात आली होती. आता मात्र व्यावसायिक गॅसच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे हॉटेल्समधील खाद्यपदार्थ महाग होण्याची शक्यता आहे.
या नव्या दरवाढीनंतर आता दिल्लीत एका सिलिंडरसाठी 1769.50 रुपये, कोलकाता शहरात 1887 रुपये, मुंबईत 1723.50 आणि चेन्नईत 1723.50 रुपये असे दर झाले आहेत. या दरवाढीमुळे व्यापारी वर्गाला झटका बसला आहे. तेल कंपन्यांनी मात्र घरगुती गॅसच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. व्यावसायिक गॅसचे दर कमी जास्त होत असताना मागील वर्षभरापासून घरगुती गॅसचे दर मात्र स्थिर आहेत.
दिलासादायक बातमी! वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG सिलिंडरच्या किंमतीत कपात, जाणून घ्या आजचे दर
घरगुती गॅस जैसे थे
या दरवाढीतून घरगुती गॅसधारकांना दिलासा मिळाला आहे. या गॅसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दोन महिन्यांपासून घरगुती गॅसच्या दरात वाढ झालेली नाही. याआधी ऑगस्ट महिन्यात दर कपात करण्यात आली होती. 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडर ऑगस्ट महिन्यातील दरावरच मिळत आहे. दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये तर चेन्नई 918.50 रुपये या दरांत घरगुती गॅस मिळत आहे.