दिलासादायक बातमी! वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG सिलिंडरच्या किंमतीत कपात, जाणून घ्या आजचे दर
LPG Cylinder Price : आधीच महागाई आणि इंधन दरवाढीमुळे होरपळून निघालेल्या जनतेला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारनं (Central Government) दिलासा दिला. तो म्हणजे, तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. मात्र, ही कपात केवळ व्यावसायिक सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे थे आहेत.
कोरेगाव-भीमामध्ये भीम अनुयायांची गर्दी, अजित पवारांनीही केलं विजयस्तंभाला अभिवादन
तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर करत असतात. आजही पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर केले. यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत तर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती ‘जैसे थे’ ठेवण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे मिठाईची दुकाने आणि लग्न समारंभात वापरला जाणार व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आजपासून स्वस्त झाला आहे.
Sanskruti Balgude : संस्कृतीच्या निळ्या शिमरी ड्रेमधील हॉट अंदाज, मादक अदा
गेल्या महिन्यातही केंद्राने व्यावसायिक सिलिंडरची किंमत 30.50 रुपयांनी कमी केली होती. त्यामुळं व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला होता. आता 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने सिलिंडरच्या दरात मोठी कपात अपेक्षित होती. कारण 2019 मध्ये पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती LPG ग्राहकांना नवीन वर्षाची भेट दिली होती. मात्र, आज व्यावसायिक सिलिंडरचे दर फक्त अवघ्या काहीच रुपयांनी कमी करण्यात आले आहेत.
दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2 रुपयांनी कमी झाली आहे. तर मुंबईत व्यावसायिक सिलिंडर 1.50 रुपयांना स्वस्त झाला असून त्याची किंमत 1708.50 रुपयांवर आली आहे. चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस 4.50 रुपयांनी कमी झाला असून 1924.50 रुपयांवर आला. तर दुसरीकडे, तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या म्हणजेच 14 किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही.
30 ऑगस्ट रोजी घरगुती गॅसच्या दरात 200 रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्यानंतर राजधानी दिल्लीत गॅस सिलिंडरची किंमत 903 रुपये झाली होती. सध्या मुंबईत घरगुती गॅस 902.50 रुपयांना उपलब्ध आहे. तर चेन्नईमध्ये घरगुती गॅस 918.50 रुपयांना मिळत आहे.