Download App

PM रिसर्च फेलोशिप म्हणजे काय? किती मिळतात पैसे? सरकारने केली मोठी घोषणा

पुढील पाच वर्षांत दहा हजार फेलोशिप दिल्या जातील अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिली.

PM Research Fellowship : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी (Nirmala Sitharaman) देशाचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात (Budget 2025) त्यांनी पीएम फेलोशिपच्या संख्येत वाढ करण्याची घोषणा केली. पुढील पाच वर्षांत दहा हजार फेलोशिप (PM Research Fellowship) दिल्या जातील असे त्यांनी सांगितले. आगामी काळात या योजनेला आधिक प्रोत्साहन देण्याचा सरकारचा उद्देश आहे. चला तर मग ही फेलोशीप कुणाला आणि किती कालावधीसाठी दिली जाते याची माहिती घेऊ या..

यंदाच्या बजेटमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी (Budget Session) मोठ्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या. पुढील वर्षांत देशभरात मेडिकलच्या 10 हजार जागा नव्याने वाढविण्यात येतील तर आगामी पाच वर्षांत 75 हजार नवीन जागा जोडण्यात येतील. तांत्रिक संशोधनाला चालना देण्यासाठी पीएम फेलोशिप योजनेंतर्गत पुढील पाच वर्षांत 10 हजार नवीन फेलोशिप दिल्या जातील असे मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. पीएम फेलोशीप योजनेत कुणाला आणि किती पैसे मिळतात तसेच यासाठी पात्रता काय असते या महत्वाच्या बाबींची माहिती असणे गरजेचे आहे.

भारताचा शेजाऱ्यांवर धनवर्षाव! बजेटमध्ये भरीव तरतूद; ‘या’ देशाला मिळणार सर्वाधिक मदत

तांत्रिक संशोधनाला चालना देण्यासाठी सन 2018-19 च्या बजेटमध्ये पीएम रिसर्च फेलोशीप योजनेची घोषणा करण्यात आली होती. ही फेलोशिप आयआयटी आणि आयआयएससीमध्ये रिसर्चसाठी देण्यात येते. फेलोशीप डॉक्टरेट रिसर्चसाठी देखील देण्यात येते. सन 2014 नंतर सुरू करण्यात आलेल्या पाच आयआयटींचा विस्तार करण्यात येणार असल्याचेही सीतारामन यांनी सांगितले.

फेलोशिप योजनेसाठी पात्रता काय

फेलोशीपसाठी उमेदवाराकडे आयआयटी, एनआयटी आणि आयआयएससीकडून सायन्स आणि बीटेक आणि एमटेडची पदवी असणे गरजेचे आहे. या संस्थांमधून दुहेरी डिग्री प्राप्त करणारे विद्यार्थी सुद्धा फेलोशिपसाठी अर्ज करू शकतात. गेट परीक्षा पास करणे सुद्धा बंधनकारक आहे तसेच परीक्षेत 650 मार्क मिळालेले असले पाहिजेत.

पीएम रिसर्च फेलोशिप अंतर्गत पात्र उमेदवाराला पाच वर्षांसाठी रिसर्चसाठी एक निश्चित रक्कम दर महिन्याला दिली जाते. पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांत उमेदवाराला दरमहा 70 हजार रुपये दिले जातात. तिसऱ्या वर्षात 75 हजार रुपये तसेच चौथ्या आणि पाचव्या वर्षात 80 हजार रुपये दिले जातात. या व्यतिरिक्त योग्य उमेदवाराला रिसर्चसाठी दोन लाख रुपये दरवर्षी दिले जातात.

Union Budget 2025: पगारदारांसाठी बजेट गेमचेंजर ! पण रुपया कसा येणार आणि कसा जाणार ?

follow us