Bus Accident : देशात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. आता असाच एक भीषण (Bus Accident) अपघात छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात झाला आहे. बस खाणीत कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 30 हून आधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांच्याकडून मदतकार्य सुरू करण्यात आले. या भीषण अपघातामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.
Road Accident : पायी जाणाऱ्या भाविकांना पिकअपने उडवले; चार जण जागीच ठार
मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बस मुरुमाच्या खाणीत कोसळली. ही घटना खपरी गावाजवळ घडली. दुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक जितेंद्र शुक्ला यांनी सांगितले की मंगळवारी रात्री 8.30 वाजता डिस्टलरी कंपनीत काम करणारे कामगार काम संपवून आपल्या घरी निघाले होते. या अपघातातील जखमींना नजीकच्या दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.
या घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. गंभीर जखमींना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. बस अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाला असावा असे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे सांगण्यात आले. न्यूज एजन्सी नुसार या बसमध्ये 40 प्रवासी होते. यानंतर बस रस्त्यावरून घसरून 50 फूट खोल दरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक येथे दाखल झाले.
Road Accident : कार दुभाजकावर धडकली; भीषण अपघातात महिला आमदाराचा मृत्यू
रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी या महामार्गावर अपघात सातत्याने होत आहेत. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे.