Union Budget 2024 : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. (Budget) अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करतील. मात्र, हा अर्थसंकल्प कसा असणार आहे हे तो सादर झाल्यानंतरच कळेल. दरम्यान, काही घटना इतिहासाशी संबंधित आहेत ज्यामध्ये त्यावेळीचे अर्थसंकल्प अनेक टप्प्यांवर देशाला पुढे घेऊन गेले. 1991 साली जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. (Nirmala Sitharaman) त्याला ‘रीव्होल्युशनरी बजेट’ असंही म्हणतात. या अर्थसंकल्पाने देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्याचं काम केलं.
आर्थिक उदारीकरणाच्या युगाची सुरुवात
सन 1991 मध्ये पी.व्ही. नरसिंह राव पंतप्रधान होते आणि त्यांच्या सरकारमध्ये वित्त मंत्रालयाची जबाबदारी अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे होती. हे वर्ष ऐतिहासिक अर्थसंकल्पाचं वर्ष ठरलं. खरं, तर मनमोहन सिंग यांनी देशातील परवानाधारक राजवट संपवून आर्थिक उदारीकरणाचे युग सुरू केलं होतं. हा अर्थसंकल्प अशा वेळी सादर करण्यात आला, जेव्हा देश आर्थिक अधोगतीकडे वाटचाल करत होता. या अर्थसंकल्पात निर्यातीबाबत अनेक मोठी पावलं उचलण्यात आली. सीमाशुल्क 220 टक्क्यांवरून 150 टक्के करण्यात आलं. तसंच विदेशी गुंतवणूकदारांसाठी दरवाजे खुले करण्यात आले.
‘एपोचल बजेट’ Budget : संध्याकाळचं बजेट सकाळी; एकाच निर्णयानं ब्रिटीशकालीन परंपरा मोडीत
तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी 1991 साली सादर केलेला हा अर्थसंकल्प ‘उत्क्रांतीवादी अर्थसंकल्प’ म्हणून ओळखला जातो. या अर्थसंकल्पात परदेशी कंपन्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती आणि त्यासाठी अनेक नियमांमध्ये बदलही करण्यात आले होते. या पावलामुळे देशातून निर्यात होणाऱ्या उत्पादनांची संख्या वाढली. त्यामुळे सरकारी तिजोरीही भरू लागली आणि हळूहळू देश विकासाकडे वाटचाल करू लागला.