Budget : संध्याकाळचं बजेट सकाळी; एकाच निर्णयानं ब्रिटीशकालीन परंपरा मोडीत

Budget : संध्याकाळचं बजेट सकाळी; एकाच निर्णयानं ब्रिटीशकालीन परंपरा मोडीत

Budget 2024 : केंद्रातील मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पाहिले संपूर्ण बजेट (Budget 2024) आज सादर करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज थोड्या वेळात संसदेत बजेट सादर करतील. आगामी काळात राबवल्या जाणाऱ्या विकास कामांचा लेखाजोखा या बजेटमध्ये (Union Budget 2024) असणार आहे. आज सकाळी 11 वाजता लोकसभेत बजेट सादर करण्यात येईल. मागील काही वर्षांपासून बजेट सकाळीच सादर केले जात आहे. मात्र आधी असे नव्हते. अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ संध्याकाळी होती. नंतर यामध्ये बदल करून सकाळी 11 वाजता अशी करण्यात आली. सरकारने हे शिरस्ता का बदलला याची माहिती घेऊ या..

बजेटची वेळ केव्हा बदलली

सन 1999 पर्यंत संध्याकाळी 5 वाजता बजेट सादर केले जात होते. ही परंपरा ब्रिटिश सरकारच्या काळापासून सुरू होती. यामुळे लंडन आणि भारतात एकाच वेळी घोषणा करता येऊ शकत होत्या. ब्रिटनची वेळ भारतापेक्षा 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. त्यामुळं भारतातील संध्याकाळी पाच वाजताची वेळ सकाळच्या साडेअकरा वाजण्याच्या बरोबर होती.

महिलांसाठी येणार अच्छे दिन, Budget 2024 मध्ये मोदी सरकार करणार मोठा धमाका

यशवंत सिन्हा यांनी बदलली वेळ

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा याच वेळेला बजेट सादर केले जात होते. सन 1999 पर्यंत याच वेळेला बजेट सादर केले जात होते. नंतर मात्र अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील सरकार आलं तेव्हा या सरकारमधील अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ही वेळ बदलून टाकली. सकाळी 11 वाजताची नवी वेळ निश्चित करण्यात आली.

बजेटची वेळ का बदलली

बजेट सादर करण्याची वेळ बदलण्यामागे दोन कारणे होती. पहिले कारण म्हणजे भारत स्वतंत्र झाला होता आणि इंग्रजांच्या वेळेनुसार बजेट सादर करण्याचा काहीच प्रश्न नव्हता. दुसरे म्हणजे खासदार आणि अधिकाऱ्यांना बजेटचा अभ्यास आणि चर्चा करण्यासाठी जास्त वेळ मिळावा. या कारणांमुळे बजेट सादर करण्याची वेळ बदलण्यात आली. सन 1999 मध्ये 27 फेब्रुवारी रोजी तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा पहिल्यांदा सकाळी 11 वाजता केंद्रीय बजेट सादर केले होते. यानंतर याच सकाळच्या वेळेला बजेट सादर करण्यात येऊ लागले.

Budget 2024 सादर होताच सेन्सेक्स कोसळला; गुंतवणुकदारांचे 35 हजार कोटी बुडाले

बजेटच्या ब्रिटीशकालीन परंपरा बंद

आधी बजेट फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सादर केले जात होते. परंतु तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यामध्ये बदल करत बजेट 1 फेब्रुवारीला मांडण्यास सुरुवात केली. यामुळे आर्थिक वर्ष सुरू होण्याआधी एक महिन्याचा अतिरिक्त वेळ मिळाला. या वेळेत सरकारी योजना व्यवस्थित क्रियान्वित करण्यासाठी जास्तीचा वेळ मिळू लागला.

आधीच्या काळात रेल्वे बजेट स्वतंत्र (Railway Budget) सादर केले जात होते. सन 2016 मध्ये रेल्वे बजेटला केंद्रीय बजेटमध्ये समाविष्ट करण्यात आले. सरकारच्या या निर्णयामुळे 92 वर्षांपासून चालत आलेली परंपरा संपुष्टात आली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube