Chennai based startup tech company Agilisium : चेन्नईतील नावारुपाला येत (Chennai News) असलेली टेक कंपनी एजिलिसियमने दहाव्या वर्षपूर्तीनिमित्त एक खास निर्णय घेतला. कंपनीत काम करणारे कर्मचारी हेच कंपनीची खरी संपत्ती आहेत. याची जाणीव ठेवत कुणालाही हेवा वाटेल असा निर्णय घेतला. कंपनीत दीर्घ काळापासून (Tech Company Agilisium) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 25 ब्रँड न्यू ह्युंदाई क्रेटा एसयूवी गिफ्ट म्हणून दिल्या. चेन्नईस्थति कंपनीच्या कार्यालयात एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना वाहनांच्या चाव्या देण्यात आल्या.
कंपनीने आपल्या अधिकृत लिंक्डइन पेजवर या कार्यक्रमाचे काही फोटो आणि मेसेज शेअर केले आहेत. एक पोस्टही शेअर केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी कंपनीत दहा वर्षे सेवा पूर्ण केली आहे त्यांनी एसयूवी कार गिफ्ट म्हणून देण्यात आल्या, असे या पोस्टमध्ये कंपनीने म्हटलं आहे. या कार्यक्रमासाठी एजिलिसियम कंपनीतील 500 कर्मचारी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांना सरकारचं गिफ्ट! ईपीएफओच्या बैठकीत होणार पीएफच्या व्याज वाढीचा निर्णय
कंपनीचे संस्थापक आणि सीईओ राज बाबू यांनी या निमित्ताने कर्मचाऱ्यांना संबोधित केले. ते म्हणाले, आमच्या यशाची कथा आपल्यापैकी प्रत्येकाची आहे. तुमच्या प्रतिबद्धता, सचोटीशिवाय हे शक्य नव्हतं. आज आपण जिथे आहोत तिथे कदाचित नसतोही. अगदी पहिल्या दिवसापासून जे आमच्यासोबत उभे राहिले त्या लोकांना एसयूवी कार देण्याचं भाग्य मला मिळालं. ही आमची त्यांच्या प्रती कृतज्ञता आहे असे राज बाबू यांनी सांगितले. याबरोबरच त्यांनी कर्मचाऱ्यांना आणखी एक गुडन्यूज देत पगारवाढीची घोषणा केली.
कंपनीच्या या कामगिरीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. आजच्या स्पर्धेच्या काळात कर्मचाऱ्यांना त्यांचा जॉब टिकवणं अत्यंत कठीण ठरत आहे. कंपन्याही कामगार कपातीवर भर देत आहेत. अशा परिस्थितीत एक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क नवी कोरी कार गिफ्ट म्हणून देते. त्यामुळे नेटकरी कंपनीचं कौतुक करत आहेत. एगिलिसियम कंसल्टिंगच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना किती महत्व देते आणि त्यांच्या कामाचं इतकं कौतुक करते असे एका युजरने म्हटले.
गुडन्यूज! भारतातील गरीबीत 27 टक्क्यांनी घट; लोकांचं आरोग्य, शिक्षण अन् उत्पन्नही वाढलं