Download App

सोने चमकले! किंमतींनी गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या काय आहेत नवे दर

परदेशी बाजारातील मजबूत कल आणि ज्वेलर्सची सततची खरेदी यांमुळे स्थानिक बाजारात सोन्याच्या भावात मोठी वाढ दिसून आली.

Gold Price Today : आता सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे सोन्याला मागणी (Gold Rate Today) वाढू लागली आहे. व्याजदरातील कपातीचा परिणाम सोने चांदीच्या दरावर (Gold Silver Rate) होताना दिसत आहे. जागतिक आणि देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात वाढ होऊ लागली आहे. दसरा तोंडावर आला आहे. त्यानंतर लगचेच दिवाळी आहे. या सणासुदीत सोन्याची मोठी खरेदी होते. परंतु, याच टप्प्यात जगभरात सुरू असलेल्या घडामोडींचा सोने चांदीच्या दरावर परिणाम होऊ लागला आहे. या काळात तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर आधी भाव काय आहेत याची माहिती जरुर घ्या. कारण देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरांनी विक्रमी उच्चांक गाठला आहे.

परदेशी बाजारातील मजबूत कल आणि ज्वेलर्सची सततची खरेदी यांमुळे स्थानिक बाजारात सोन्याच्या भावात मोठी वाढ दिसून आली. सोमवारी दिल्लीत स्थानिक सराफा बाजारात सोन्याच्या भावात 250 रुपयांची वाढ दिसून आली. या वाढीसह सोन्याचे भाव 78 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम असा झाला आहे. ऑल इंडिया बुलियन असोसिएशनने ही माहिती दिली. चांदीच्या दरात मात्र घसरण होत आहे. चांदी 94 हजार रुपये प्रति किलो झाली आहे. शुक्रवारी चांदीचा भाव 94 हजार 200 रुपये प्रति किलो असा होता.

युद्धाचा दणका! ऐन सणासुदीत सोने भडकले, भारतात 76,500 चाही टप्पा पार; जाणून घ्या नवे दर..

80 हजारांचा टप्पा पार होणार?

आता प्रश्न असा आहे की येणाऱ्या काही दिवसांत भारतात सोन्याचे भाव 80 हजारांचा टप्पा पार करणार का. माहितीनुसार या वर्षात शेवटपर्यंत सोन्याचे भाव 80 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजमध्ये करन्सी कमॉडिटीचे प्रमुख अनुज गुप्ता यांनी सांगितले की जियो पॉलिटिकल टेन्शनमुळे सोन्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे. आगामी काळात या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

स्टॉकिस्ट आणि किरकोळ विक्रेत्यांकडून देशांतर्गत मागणी वाढल्याने सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. शेअर बाजारात घसरण होत असून याचाही परिणाम सोन्याच्या दरांवर झाला आहे. गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सोन्याचे भाव वाढत आहेत. दुसरीकडे मध्य आशियात जो तणाव निर्माण झाला आहे त्यामुळे सुद्धा सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे सांगण्यात आले.

सणासुदीच्या आधीच सोने चमकले! 76 हजारांचा टप्पाही केला पार; जाणून घ्या, सोन्याचे नवे दर

follow us