Download App

मोदींच्या दौऱ्याआधीच गुडन्यूज! चीनला टाळून अमेरिकन कंपनी भारताच्या दारात

Narendra Modi America Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) अमेरिका दौऱ्याआधीच मोठी गुडन्यूज मिळाली आहे. भारताला थोडेथोडके नाही तर तब्बल एक अब्ज डॉलर्सचे रिटर्न गिफ्ट मिळाले आहे. अमेरिकन चिप मेकर मायक्रोन टेक्नॉलॉजी कंपनीने एक अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. चीन आणि अमेरिकेत सुरू असलेल्या तणावाचा असा फायदा भारताला मिळाला आहे. आगामी काळात ही गुंतवणूक वाढण्याचीही शक्यता आहे.

सेमी कंडक्टरच्या बाजारात सध्या चीनची मक्तेदारी आहे. हीच बाब अमेरिकेला खटकत असून चीनला झटका देण्याचा प्लॅन अमेरिकेने आखला आहे. त्यासाठीच सेमीकंडक्टरच्या जागतिक बाजाराची कमान भारताच्या हाती सोपविण्याची तयारी अमेरिकेने केल्याचे दिसत आहे. या कारणामुळेच भारत सरकारनेही भारतीय चिप मेकर्सना 10 अब्ज डॉलर्स देण्याची घोषणा केली आहे.

अदानी समूहाच्या प्रकल्पाला पर्यावरणप्रेमींचा आक्षेप, कोळसा खाणीबाबत ‘अदानी’च्या हितासाठी घाईने सुनावणी

मीडिया रिपोर्टस् नुसार तज्ज्ञांनी सांगितले, की पुढील आठवड्यात मोदी अमेरिकेचा दौरा करतील त्यावेळी या कराराची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सध्या या कराराला अंतिम रुप देण्याची तयारी केली जात आहे. हा करार पंतप्रधान मोदी यांच्या मेक इन इंडिया प्रकल्पासाठी बूस्टर डोस ठरेल असे सांगण्यात येत आहे. तसेच अमेरिकेला चीनबाहेर पुरवठा साखळी मजबूत करण्याची संधी मिळेल. येत्या 21 जून रोजी पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा सुरू होणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन म्हणाले, दोन्ही देशांतील तांत्रिक व्यापारातील अडचणी दूर करणे हा सुद्धा मोदींच्या अमेरिका दौऱ्यातील महत्वाचा भाग आहे. दुसरीकडे मायक्रोनने आपल्या चीनी प्रकल्पात रोजगार निर्माण करण्यासाठी 600 मिलियन गुंतवणूक करणार असल्याचे म्हटले. या करारावर तंत्रज्ञान मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप अधिकृत वक्तव्य दिले गेलेले नाही.

तीन देशांना जोडणारा गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट, थाई मसाज घ्यायला जाता येणार स्वत:च्या कारने

अमेरिका अॅडव्हान्स्ड चिप मेकिंगमध्ये आणखी विविधता आणण्याच्या प्रयत्नात आहे. अमेरिकेतील सर्वात मोठी चिप निर्माता कंपनी मायक्रोनने जपानमध्ये उभारल्या जाणाऱ्या 3.6 अब्ज डॉलर्सच्या नेक्सटजेन प्रकल्पासाठी आर्थिक पाठबळ मिळवले आहे.

Tags

follow us