By-election Result 2025 : देशातील चार राज्यातील 5 विधानसभा जागांवर गेल्या आठवड्यात झालेल्या पोटनिवडणुकीचे आज निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीत भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. 5 विधानसभासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाने (AAP) दोन जागांवर बाजी मारली असून काॅंग्रेस (Congress) आणि टीएमसीला (TMC) एक-एक जागा मिळाली आहे.
आज निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील विसावदर आणि पंजाबमधील लुधियाना पश्चिम जागा राखण्यात आम आदमी पक्षाला यश आले आहे तर गुजरातमधील कडी विधानसभा जागेवर पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली आहे.
तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधील कालीगंज जागेवर ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत जागा जिंकली. या जागेवर टीएमसीच्या अलिफा अहमद यांनी 45 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. तर केरळमध्ये काँग्रेसने बाजी मारली. केरळच्या निलांभर जागेवरून काँग्रेसचे आर्यदन शौकत जिंकले आहे. त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय-एम) नेतृत्वाखालील एलडीएफ उमेदवार एम. स्वराज यांचा पराभव केला आहे.
#ByElectionResult final#Kadi – BJP Retains#Visavadar – AAP Retains
Nilambur – Cong Gains from LDF
Ludhiana West – AAP Retains
Kaliganj – TMC RetainsOverall
AAP – 2(0)
BJP – 1(0)
INC – 1(+1)
TMC – 1(0)
LDF IND – 0(-1)#ByElection pic.twitter.com/8C1V9FRb7m— Ganesh (@me_ganesh14) June 23, 2025
आम आदमी पक्षासाठी गुजरातच्या विसावदर जागेवरून विजय महत्त्वाचा आहे. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत येथे आम आदमी पक्षाचे भूपेंद्र भयानी विजयी झाले होते, परंतु त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ‘आप’ साठी ही निवडणूक महत्वाची होती. आम आदमी पक्षाकडून या निवडणुकीसाठी गोपाल इटालिया यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी भाजपच्या किरीट पटेल यांच्याविरुद्ध 17,581 मतांनी विजय मिळवला आहे. तर आम आदमी पक्षाचे संजीव अरोरा यांनी लुधियाना पश्चिम जागेवर विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत बाजी मारली.
मुकेश अंबानींच्या खास मित्राने घेतला संन्यास, सोडली 75 कोटी रूपये पगाराची नोकरी