Pollution Alert : स्वित्झर्लंडची हवा गुणवत्ता कंपनी आयक्यूएयरच्या वर्ल्ड एअर क्वालिटी अहवालात धक्कादायक खुलासा झाला आहे. जगातील 20 सर्वाधिक प्रदुषित शहरांत एकट्या भारतातील तब्बल 13 शहरांचा समावेश आहे. भारतासाठी ही बाब निश्चितच (Pollution Alert) भूषणावह नाही. परंतु, भारतात वेगाने वाढणारे शहरीकरण, औद्योगिकरण यांमुळे प्रदूषण (Air Pollution) वाढत चालले आहे. या यादीत आसाम राज्यातील बर्नीहाट शहर आघाडीवर आहे. तर दिल्ली जगातील (Pollution in Delhi) सर्वाधिक प्रदुषित शहर ठरले आहे.
दिल्लीमध्ये पार्टीक्युलेट मॅटरचे 2.5 सरासरी प्रमाण 91.6 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतके मोजण्यात आले. सन 2023 मधील 92.7 मायक्रोग्रॅम घनमीटरच्या तुलनेत एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे. यासह दिल्ली सलग दुसऱ्यांदा जगातील सर्वाधिक प्रदुषित शहर ठरले आहे.
भारत आता जगातील पाचवा सर्वाधिक प्रदुषित देश बनला आहे. 2023 मध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर होता. सन 2024 मध्ये भारतात पीएम 2.5 चे सरासरी प्रमाण 50.6 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर होते. 2023 मधील 54.4 मायक्रोग्रॅम घनमीटर पेक्षा सात टक्क्यांनी कमी होते. जगातील सर्वाधिक 10 प्रदुषित शहरांतील सर्वाधिक सहा शहरे भारतातीलच आहेत. 35 टक्के भारतीय शहरांत पीएम 2.5 ची पातळी डब्ल्यूएचओच्या निश्चित (World Health Organization) मर्यादेपेक्षा 10 पट जास्त दिसून आली.
धक्कादायक! पाच महिन्यांत भारतात 10 दिवस सर्वाधिक प्रदूषण; ‘या’ शहराचा पहिला क्रमांक
देशातील सर्वाधिक 13 प्रदुषित शहरांचा विचार केला तर यामध्ये आसामचे एक शहर, पंजाबमधील एक शहर, राजधानी दिल्लीतील दोन शहरे, हरियाणातील दोन शहरे, राजस्थानातील तीन शहरे आणि उत्तर प्रदेशातील सर्वाधिक चार शहरांचा समावेश आहे. सर्वाधिक तेरा प्रदुषित शहरांत बर्नीहाट (आसाम), दिल्ली, मुल्लापूर (पंजाब), फरीदाबाद, गुरुग्राम (हरियाणा), नवी दिल्ली, गंगानगर, भिवाडी, हनुमानगढ (राजस्थान), मुजफ्फरनगर, नोएडा, लोनी, ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) या शहरांचा समावेश आहे.
पीएम 2.5 च्या अत्याधिक प्रमाणामुळे श्वासासंबंधी गंभीर समस्या निर्माण होतात. हृदयरोग, कॅन्सर यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ स्टडीनुसार 2009 ते 2019 दरम्यान प्रत्येक वर्षी भारतात जवळपास 15 लाख मृत्यू दीर्घकाळ पीएम 2.5 प्रदुषणाच्या संपर्कात राहिल्याने झाले होते. वायू प्रदुषणामुळे (Air Pollution) भारतात सरासरी आयुष्यमान 5.2 वर्षांनी घटत चालले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी वैज्ञानिक आणि आरोग्य मंत्रालयाच्या सल्लागार डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्यानुसार भारताने वायू गुणवत्ता डेटा गोळा करण्यात प्रगती केली आहे. परंतु, आता यात ठोस कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.
Delhi Pollution : राजधानी दिल्लीत धुराचं साम्राज्य; वाहने, शाळांसह लाकूड जाळण्यावर बंदी