Assam Beef Ban : मोठी बातमी! हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांस खाण्यावर बंदी

  • Written By: Published:
Assam Beef Ban : मोठी बातमी! हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांस खाण्यावर बंदी

Assam Beef Ban : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता आसाममध्ये हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांस सर्व्ह (Beef Ban) करण्यास आणि खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोमांस सेवनाबाबतच्या सध्याच्या कायद्यात सुधारणा करून नव्या तरतुदींचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोमांस सेवनाबाबतच्या सध्याच्या कायद्यात सुधारणा करून नव्या तरतुदींचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिली. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, आम्ही रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि सार्वजनिक ठिकाणी बीफ सर्व्ह करण्यावर आणि खाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढे बोलताना हिमंता बिस्वा सरमा की, आम्ही निर्णय घेतला आहे की कोणत्याही रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये बीफ दिले जाणार नाही आणि कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा सार्वजनिक ठिकाणी देखील बीफ मिळणार नाही. म्हणून आजपासून आम्ही हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांस खाणे पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

यापूर्वी मंदिरांजवळ गोमांस खाणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आता आम्ही ते संपूर्ण राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये बोलताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.

फडणवीसांना शुभेच्छा देणार पण, पहिल्या सारखं लफड्यात पडायचं नाही; जरांगेंनी सांगून टाकलं…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube