धक्कादायक! ‘या’ राज्यातील महिला करतात सर्वाधिक मद्यपान; पुरुष तळीरामांना पछाडलं

धक्कादायक! ‘या’ राज्यातील महिला करतात सर्वाधिक मद्यपान; पुरुष तळीरामांना पछाडलं

नवी दिल्ली :  देशात सर्वाधिक मद्यपान कोण करतं पुरुष की महिला? असा प्रश्न कधी ना कधी तुमच्या कानावर पडला असेलच. या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. या प्रश्नाचं उत्तर ऐकून तुम्हाला निश्चितच धक्का बसेल. या संदर्भात केंद्रीय स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक सर्वे केला होता. यामध्ये अगदीच हैराण करणारी माहिती समोर आली आहे. हा सर्वे खरंच आश्चर्यकारक असून याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे की देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक मद्यपान केले जाते. तळीरामांची संख्या देशभरातच आहे. परंतु, यातील काही राज्यात दारू रिचवणाऱ्यांची संख्या जरा जास्तच आहे. फक्त पुरुषच नाही तर महिला सुद्धा आघाडीवर आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सर्वेतून धक्कादायक खुलासा झाला आहे. या सर्वेत उत्तर पूर्वेतील राज्ये आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. या सर्वेनुसार या राज्यांतील महिला सर्वाधिक मद्यपान करतात.

पत्नी मद्यपान करते म्हणजे क्रूरता नाही, घटस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाचं वक्तव्य

या सर्वेक्षणानुसार देशात मद्यपान करणाऱ्या महिलांत आसाम राज्यातील महिला आघाडीवर आहेत. देशात 15 ते 49 वयोगटातील मद्यपान करणाऱ्या महिलांचे प्रमाण फक्त 1.2 टक्के इतकं आहे. पण आसामध्ये हे प्रमाण अनेक पटींनी वाढलेलं आहे. सर्वेनुसार या राज्यातील तब्बल 16.5 टक्के महिला मद्यपान करतात. आसामनंतर मेघालय दुसऱ्या क्रमांकावर आहे. या राज्यांत 8.7 टक्के महिला मद्यपान करतात. अरुणाचल प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. या राज्यात जवळपास 3.3 टक्के महिला मद्यपान करतात. चौथ्या क्रमांकावर सिक्कीम आणि पाचव्या क्रमांकावर छत्तीसगड राज्य आहे. या राज्यांत अनुक्रमे 0.3 आणि 0.2 टक्के महिला मद्यपान करतात.

कोणत्या राज्यात पुरुष तळीराम जास्त

याच सर्वेत दारु पिणाऱ्या पुरुषांचं प्रमाणही मोजण्यात आलं आहे. याबाबतही धक्कादायक माहिती समोर आली आहे. अरुणाचल प्रदेशातील सर्वाधिक दारू पित असल्याचे समोर आले आहे. या राज्यात 15 ते 49 वयोगटातील तब्बल 59 टक्के पुरुष मद्यपान करत असल्याचे या सर्वेत नमूद करण्यात आले आहे. या राज्यांची लोकसंख्या कमी आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीने भरपूर अशी ही राज्ये आहेत. शिक्षणाचेही प्रमाण याठिकाणी वाढत आहे. अशी परिस्थिती असताना सरकारी यंत्रणांचा हा अहवाल या राज्यांसाठी काळजीत टाकणाराच आहे. मद्यातून राज्य सरकारांना मोठा महसूल मिळत असला तर नागरिकांत व्यसनाधीनता वाढत चालली आहे.

गुजरात सरकारचा मोठा निर्णय! आता गिफ्ट सिटीतील हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये करता येणार मद्यपान

follow us
  • fb
  • instagram
  • youtube