Amit Shah on CAA: देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (Citizenship Amendment Act) विरोध होत असतांना सरकार हा कायदा आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसत. नुकतेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मोठे वक्तव्य केलं. केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करेल, त्याची अंमलबजावणी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असं विधान त्यांनी केलं. पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरातील धर्मतळला येथे एका जाहीर सभेत बोलतांनी शाह यांनी हे विधान केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
सत्ताधारी आमदारांच्या निधीचा ‘सातबारा’ अधिवेशनात निघणार; राष्ट्रवादीने सांगितला ‘मास्टर प्लॅन’
शाह यांनी तुष्टीकरण, घुसखोरी, भ्रष्टाचार आणि राजकीय हिंसाचार या मुद्द्यांवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ममता बॅनर्जींनी राज्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप शाह यांनी केला. ते म्हणाले, ममता बॅनर्जी घुसखोरीला पाठिंबा देत असल्याने CAA ला विरोध करत आहेत. एवढी घुसखोरी असलेल्या राज्यात विकास होऊ शकत नाही, अशा शब्दात शाह यांनी टीका केली.
‘राज्यात निजामी अन् रयतेतल्या मराठ्यांचं भांडण’; मराठा आरक्षण वादात आंबेडकरांचा खडा
CAA ची अंमलबजावणी करणारच
सीएएचा संदर्भ देत अमित शाह म्हणाले की, ममता बॅनर्जी याला विरोध करत आहेत, पण त्याची अंमलबजावणी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. घुसखोरीच्या मुद्द्यावरून ममता बॅनर्जींनी एकेकाळी संसद ठप्प केली होती, मात्र आता त्या गप्प असल्याचं शाह म्हणाले. आसामच्या जनतेनं तिथं भाजपचं सरकार आणलं, आता त्यांच्या सीमवेर चीटपाखरूही घुसू शकत नाही. भाजपची सत्ता आल्यानंतर तेथे कोणीही घुसखोरी करू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला.
ते म्हणाले, घुसखोरी रोखण्यासाठी आसामने प्रशंसनीय काम केले आहे. मात्र तृणमूल सरकारच्या व्होट बँकेच्या राजकारणामुळे पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी सुरूच आहे. ममता बॅनर्जी CAA ला विरोध करत आहेत, पण मी स्पष्टपणे सांगतो की CAA देशात लागू होईल. CAA ची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही, सीएए लागू करणारच, असं शाह म्हणाले.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपताच भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याची सुरुवात कोलकात्यापासून झाली. यावेळी अमित शाह यांनी राज्य सरकार उलथवून पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपला निवडून देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजपची कामगिरी विजयाची पायाभरणी करेल. शाह म्हणाले, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला इतक्या जागा द्या की मोदीजी म्हणतील की मी बंगालमुळे पंतप्रधान झालो. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्याशी सुसंगत सरकार निवडून तृणमूलचा कथित गैरकारभार संपविण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा नेमका काय?
पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि अफगाणिस्तानमधून भारतात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. CAA हा त्याचाच एक भाग आहे. नागरिकत्व (सुधारणा) कायदा 2019 मध्ये अशी तरतूद आहे की धार्मिक छळामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चनांना बेकायदेशीर स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल. श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लिम आणि पाकिस्तानमधील मुस्लिमांच्या इतर समुदायांना या कायद्याचा लाभ मिळणार नाही.