NHAI On Toll Plaza : राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना टोल भरणे अनिवार्य असते. मात्र, टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना केवळ ओळखपत्र दाखवून टोलमधून पूर्ण सूट मिळते, असा समज अनेकांमध्ये आहे. या चर्चांना पूर्णविराम देत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नुकतेच याबाबतचे वास्तव स्पष्ट केले आहे.
टोल प्लाझाजवळ राहणाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा आहे का?
NHAI ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत सांगितले की, टोल प्लाझाच्या परिसरात राहणाऱ्या सर्व स्थानिक नागरिकांना केवळ ओळखपत्राच्या आधारे टोलमाफी मिळते, ही माहिती चुकीची आहे. अशा प्रकारची कोणतीही सार्वत्रिक मोफत सुविधा अस्तित्वात नाही.
मग स्थानिकांना कोणता लाभ मिळतो?
NHAI च्या नियमानुसार, पात्र स्थानिक नागरिकांना ठराविक अटी व शर्तींच्या अधीन राहून ‘लोकल मंथली पास’ची सुविधा उपलब्ध असते. या पासद्वारे टोल शुल्कात मोठी सवलत मिळू शकते. साधारणपणे ही सुविधा टोल प्लाझापासून सुमारे 20 किलोमीटर परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी लागू असते. मात्र, प्रत्येक टोल प्लाझानुसार नियम आणि पात्रतेचे निकष वेगळे असू शकतात.
🚧 Know Your National Highways | #MythvsFact
Today’s myth addresses a common misconception that all local residents living near a toll plaza can travel toll-free simply by showing their identity cards.
In reality, there is no provision for free travel for local residents. As… pic.twitter.com/sqxOgjiYXa
— NHAI (@NHAI_Official) June 12, 2026
1000 रूपयांचा फास्टॅग रिचार्ज रिवॉर्ड मिळवण्याची संधी
राष्ट्रीय महामार्गांवरील स्वच्छता सुधारण्यासाठी NHAI ने 30 जून 2026 पर्यंत ‘क्लीन टॉयलेट पिक्चर चॅलेंज’ सुरू केले आहे. महामार्गावरील टोल प्लाझांवर अस्वच्छ शौचालय आढळल्यास प्रवाशांनी त्याची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी ‘राजमार्ग यात्रा’ (Rajmarg Yatra) अॅपच्या नव्या आवृत्तीद्वारे लोकेशनसह छायाचित्र अपलोड करावे लागेल. त्यासोबत नाव, वाहन क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाची माहिती देणे आवश्यक आहे. योग्य आणि पडताळणीयोग्य माहिती देणाऱ्या निवडक प्रवाशांना NHAI कडून 1000 च्या FASTag रिचार्जचे बक्षीस दिले जाणार आहे. त्यामुळे महामार्गावरील स्वच्छता राखण्यासाठी प्रवाशांचाही सहभाग वाढवण्याचा NHAI चा प्रयत्न आहे.
To enhance commuter convenience and maintain high hygiene standards across National Highways, #NHAI is conducting the ‘#CleanToiletPictureChallenge’ till 30th June 2026.
National Highway users are encouraged to report any unclean toilet facilities at Toll Plazas.
➡️ Upload… pic.twitter.com/9ruH3kQOmN
— NHAI (@NHAI_Official) June 12, 2026
