Download App

मोठी बातमी : ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले पराग जैन ‘रॉ’ चे नवे बॉस

Parag Jain : ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले पराग जैन यांची केंद्र सरकारने रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (RAW) चे नवे प्रमुख म्हणून

  • Written By: Last Updated:

Parag Jain : ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले पराग जैन (Parag Jain) यांची केंद्र सरकारने रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (RAW) चे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. पराग जैन हे सध्याचे RAW प्रमुख रवी सिन्हा (Ravi Sinha) यांची जागा घेणार आहे. रवी सिन्हा यांचा सध्याचा कार्यकाळ 30 जून रोजी संपत आहे. तर जैन 1 जुलै 2025 रोजी दोन वर्षांच्या निश्चित कार्यकाळासाठी पदभार स्वीकारणार आहे.

कोण आहेत पराग जैन?

पराग जैन हे 1989 च्या बॅचचे पंजाब कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. पराग जैन यांनी चंदीगडचे एसएसपी म्हणून काम पाहिले आहे. यासोबतच त्यांनी कॅनडा आणि श्रीलंकेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. पराग जैन जम्मू आणि काश्मीरमध्येही तैनात आहेत, दहशतवादविरोधी रणनीतीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्या एव्हिएशन रिसर्च सेंटर (ARC) चे प्रमुख म्हणून काम करत आहेत. या संस्थेने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी लपण्याच्या ठिकाणांची गुप्त माहिती गोळा केली होती, त्यानंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीरित्या राबवले.

RAW नेमकं काय?

RAW ही भारताची गुप्तचर संस्था आहे, जी परदेशात आणि देशात घडणाऱ्या देशविरोधी कटांची माहिती गोळा करते आणि ती माहिती सुरक्षा संस्थांसोबत शेअर करते जेणेकरून ते हाणून पाडता येतील. 21 सप्टेंबर 1968  रोजी याची स्थापना झाली. आर.एन. काओ हे रॉ चे पहिले प्रमुख होते. पंतप्रधान RAW चे प्रभारी असतात. RAW चे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी असलेल्या व्यक्तीला दररोज अहवाल देतात.

‘मी खामेनीला मृत्यूपासून वाचवले…’अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा 

follow us