Download App

Ayodhya : प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या ‘बातम्यांबाबत’ काळजी घ्या… मोदी सरकारची तंबी!

येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी भाजप (BJP) आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. अशात आता केंद्र सरकारने काही मार्गदर्शक सूचना जारी करून मीडिया आऊटलेट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला राम मंदिर कार्यक्रमाशी संबंधित खोट्या आणि फेरफार करणाऱ्या बातम्या प्रकाशित न करण्याचे आवाहन केले आहे. (Central government has issued some guidelines asking media outlets and social media platforms not to publish false and manipulative news related to the Ram Mandir event)

मार्गदर्शक सूचनांमध्ये काय म्हटले आहे?

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले की, “काही खोटे, प्रक्षोभक आणि बनावट संदेश पसरवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे, विशेषत: सोशल मीडियावर याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे जातीय सलोखा आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू शकते. याशिवाय राम मंदिर सोहळ्यापूर्वी व्हीआयपी तिकिटे, राम मंदिराचा प्रसाद देण्याचा दावा करणाऱ्या अनेक बनावट लिंक्स सोशल मीडियावर दिसत आहेत”.

10 वर्षांपूर्वीच्या मदतीची PM मोदींनी ठेवली आठवण : अमेरिकेतील मित्राला राम मंदिर सोहळ्याचे ‘खास’ निमंत्रण

राम मंदिर प्रसादासाठी अॅमेझॉनला नोटीस

शुक्रवारी (19 जानेवारी) ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दिशाभूल करणाऱ्या अयोध्या राम मंदिर प्रसादची लिस्टिंग काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. यावर अॅमेझॉनने योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

‘होय, आमंत्रण मिळाले मी अयोध्येला जाणार नाही पण..; अखिलेश यादवांनी ट्रस्टला पत्रच धाडलं

VIP तिकिटाचा बनावट QR व्हायरल

काही दिवसांपूर्वी, प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाच्या झटपट व्हीआयपी तिकिटांचा दावा करणारा बनावट QR कोड असलेला एक व्हॉट्सअॅप मेसेज व्हायरल झाला होता. त्यानंतर मंदिर ट्रस्टने हा खोडसाळपणा असल्याचे म्हटले होते. केवळ निवडक पाहुण्यांना अभिषेक कार्यक्रमासाठी आमंत्रण पाठवले असल्याचेही ट्रस्टने सांगितले होते.

follow us