Download App

iPhone आणि Android वर वेगवेगळे दर का? उबर, ओलाला केंद्र सरकारची नोटीस

Government Notice To Ola-Uber : केंद्र सरकारने कॅब अ‍ॅग्रीगेटर्स ओला आणि उबर यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार,

  • Written By: Last Updated:

Government Notice To Ola-Uber : केंद्र सरकारने कॅब अ‍ॅग्रीगेटर्स ओला (Ola) आणि उबर (Uber) यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, एकाच सेवेसाठी आयफोन (iPhone) आणि अँड्रॉइड (Android) स्मार्टफोनवर ग्राहकांना वेगवगेळ्या किंमत दाखवण्यात येत असल्याने याबाबत ग्राहक व्यवहार मंत्रालयाने कॅब अ‍ॅग्रीगेटर्स ओला आणि उबर यांना नोटीस बजावली आहे.

या नोटीसमध्ये आयफोन आणि अँड्रॉइड स्मार्टफोनवर ग्राहकांना वेगवेगळ्या किंमत का? दाखवण्यात येत आहे. याबाबत स्पष्टीकरण केंद्र सरकारने मागितले आहे.

सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले की कंपनी एकाच सेवेसाठी आयफोन किंवा अँड्रॉइड डिव्हाइस वापरणाऱ्या ग्राहकांकडून वेगवेगळे भाडे आकारत आहे. त्यामुळे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) कारवाई करत ओला आणि उबर यांना नोटीस बजावली आहे. याबाबत केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनीही एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती शेअर केली आहे.

वेगवेगळ्या मॉडेल्सच्या मोबाईलमध्ये एकाच सेवेसाठी चार्ज वेगवेगळे दिसून येत असल्याने सीसीपीएमार्फत ग्राहक व्यवहार विभागाने प्रमुख कॅब एग्रीगेटर्स ओला आणि उबर यांना नोटिसा बजावल्या आहेत आणि त्यांचे उत्तर मागितले आहे.  अशी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

‘…त्यांनी डिपार्टमेंटला सांगावं’, सैफवर हल्ल्याप्रकरणी राणेंना शंका, अजित पवारांनी केलं स्पष्ट

कॅब अ‍ॅग्रीगेटर्स ओला आणि उबर कंपनीकडून एकाच सेवेसाठी वेगवेगळे चार्ज घेत आहे का? याचा तपास करण्यासाठी केंद्र सरकारकडून ओला आणि उबरला नोटीस बजावण्यात आली आहे. जर असे घडत असेल तर ते ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन असू शकते.

काही दिवसांपूर्वी अनेक ग्राहकांनी तक्रार केली होती की आयफोन आणि अँड्रॉइड ग्राहकांना एकाच सेवेसाठी वेगवेगळी किंमत दाखवण्यात येत आहे. त्यानंतर ग्राहक व्यवहार मंत्रालयाने कॅब अ‍ॅग्रीगेटर्स ओला आणि उबर यांना नोटीस बजावली आहे.

follow us

संबंधित बातम्या