Excise duty on petrol, diesel increased by Rs 2 : केंद्र सरकारने सोमवारी (७ एप्रिल २०२५) पेट्रोल आणि डिझेलच्या उ्त्पादन शुल्कात वाढ करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात २ रुपयांची वाढ केली आहे. एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे आज (दि.7) सकाळी शेअर बाजारात तीन हजार अंकांपेक्षा जास्त घसरण पाहण्यास मिळाली. यामुळे करोडो गुंतवणूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हा झटका सहन होत नाही तोच आता केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पाद शुल्कात (Excise duty) दोन रूपयांची वाढ केली आहे. याबाबत अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचनादेखील जारी करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्र सरकार ने पेट्रोल और डीजल पर 2-2 रुपए उत्पाद शुल्क बढ़ाया: राजस्व विभाग की अधिसूचना pic.twitter.com/I8KDtaD2dP
— ANI_HindiNews (@AHindinews) April 7, 2025
सरकारच्या निर्णयानंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार का?
सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात २ रुपयांची वाढ करणार असल्याची अधिसूचना जारी केली आहे. पण, सरकारने जरी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केली तरी, सामान्यांच्या खिशावर या वाढीचा काही परिणाम होणार नाही. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वाढीव उत्पादन शुल्काचा भार तेल कंपन्यांना सोसावा लागेल असेही सांगितले जात आहे.
‘या’ सहा कारणांमुळे शेअर बाजार कोसळला…
या संदर्भात अर्थ मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. यात पेट्रोलवरील उत्पादन शुल्क आता प्रति लिटर १३ रूपये झाल्याचा उल्लेख केला आहे. तर, डिझेलवरील हे शुल्क प्रति लिटर १० रूपये झाल्याचा उल्लेख केला आहे. पण, या वाढवलेल्या शुल्काचा किरकोळ किमतींवर काय परिणाम होईल हे आदेशात नमूद केलेले नाही. नवीन दर ८ एप्रिलपासून लागू होतील. गेल्या वर्षी १४ मार्च रोजी, सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांची कपात केली होती.
पेट्रोल की सीएनजी, कोणती कार ठरेल बेस्ट? जाणून घ्या, ए टू झेड माहिती..
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कसे?
अमेरिकन बेंचमार्क कच्च्या तेलाचा भाव ४% म्हणजेच २.५० डॉलर्सने घसरून ५९.४९ डॉलर्स प्रति बॅरल झाला आहे. तर, ब्रेंट क्रूड $२.२५ ने घसरून $६३.३३ प्रति बॅरलवर आला आहे. एकूणच गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. यामुळे तेल कंपन्यांचे रिफायनिंग मार्जिन वाढले आहे. म्हणूनच सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवले आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार आणि ग्राहक देश असून, भारत देशाच्या गरजेच्या ८७% कच्च्या तेलाची आयात करतो.