पेट्रोल की सीएनजी, कोणती कार ठरेल बेस्ट? जाणून घ्या, ए टू झेड माहिती..

पेट्रोल की सीएनजी, कोणती कार ठरेल बेस्ट? जाणून घ्या, ए टू झेड माहिती..

Petrol vs CNG Vehicles : सध्याच्या दिवसात तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन करत आहात का, पेट्रोल की सीएनजी कोणती (Petrol Car) कार घ्यायची असा प्रश्न पडला आहे का? तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. यापैकी कोणतीही कार खरेदी करायची असेल तर आधी या वाहनांचे काय वैशिष्ट्य आहे याची माहिती असणे गरजेचे आहे. पेट्रोल आणि सीएनजी दोन्हीही वाहनांचे काही फायदे आणि तोटे आहेत. या गोष्टी तुमचे बजेट, ड्रायव्हिंग आणि गरजांवर अवलंबून आहेत. चला तर मग पेट्रोल की सीएनजी कोणती कार (CNG Car) खरेदी करणे फायद्याचे ठरेल याची माहिती घेऊ या..

इंधनाचा खर्च किती

पेट्रोलच्या किंमतीत मागील काही वर्षात मोठी वाढ झाली आहे. एक लिटर पेट्रोलची किंमत शंभरच्या पुढे गेली आहे. त्यामुळे वाहनचालकांना इंधनावर मोठा खर्च करावा लागत आहे. तरी सुद्धा पेट्रोल अगदी खेडेगावात सुद्धा सहज उपलब्ध आहे. सीएनजी बाबतीत अंजन तरी अशी परिस्थिती नाही.

सीएनजी इंधन पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत स्वस्त आहे. भारतात सध्या एक किलो सीएनजी 70 ते 80 रुपयांना मिळतो. पेट्रोलसाठी मात्र 103 ते 104 रुपये मोजावे लागत आहेत. सीएनजीवर चालणारी वाहने पेट्रोल वाहनांच्या तुलनेत 50 ते 60 टक्के स्वस्त असतात. यामुळे इंधनाची मोठी बचत होते.

Petrol Price : दिवाळीत आली खास बातमी! पेट्रोल अन् डिझेल स्वस्त होणार; पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती

मायलेज आणि रेंज

पेट्रोल वाहनांचे मायलेज थोडे कमी असते. तसेच या वाहनांची रेंजही सीएनजी वाहनांच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे दूरच्या प्रवासासाठी पेट्रोल वाहने जास्त खर्चिक ठरतात. सीएनजी वाहनांचा मायलेज पेट्रोल वाहनांच्या तुलनेत जास्त असतो. तसेच ही वाहने लांबच्या प्रवासासाठी जास्त फायदेशीर ठरतात.

इंजिनचे आयुष्य आणि मेंटेनन्स

पेट्रोल वाहनांचे इंजिन सीएनजी वाहनांच्या तुलनेत जास्त स्थिर आणि दीर्घ काळ चालते. पेट्रोल इंजिनच्या मेंटेनन्सचा खर्च सीएनजी वाहनांच्या तुलनेत कमी असतो. तसेच मेकॅनिक सुद्धा ठिकठिकाणी उपलब्ध आहेत.

सीएनजी वाहनांचे इंजिन पेट्रोल वाहनांच्या तुलनेत जास्त दमदार नाही. तसेच मेंटेनन्सचा खर्चही जास्त असू शकतो. इंधन टाकी आणि पाईप या दोन वस्तूंची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

रनिंग कॉस्ट

पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांची रनिंग कॉस्ट साडेचार रुपये प्रति किलोमीटर असू शकते. सीएनजी वाहनांच्या तुलनेत ही कॉस्ट जास्त आहे. सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची रनिंग कॉस्ट साधारण अडीच रुपये प्रति किलोमीटर असू शकते. यावरून स्पष्टपणे लक्षात येते की सीएनजीवर चालणारी वाहने पेट्रोल वाहनांच्या तुलनेत जास्त किफायतशीर असतात.

दीड लाखांचा डिस्काउंट अन् 461 किमीची रेंज; ‘या’ MG इलेक्ट्रिक कारवर जबरदस्त ऑफर

किंमतीत किती फरक

पेट्रोल वाहनांची किंमत सीएनजी वाहनांच्या तुलनेत अतिशय कमी असते. कोणतीही कंपनी ज्यावेळी आपली नवी कार लाँच करते त्यावेळी त्याचे बेस वेरिएंट पेट्रोलचेच असते. येथूनच कारची किंमत सुरुवातीची किंमत असते.

सीएनजी कार जास्त महाग असते. दोन्ही कारच्या किमतीत साधारण 50 ते 55 हजार रुपयांचा फरक असू शकतो. पण जर तुम्ही नंतर मार्केटमधून सीएनजी किट खरेदी करून कारमध्ये बसवायची ठरवली तर 20 ते 30 हजार रुपये खर्च येऊ शकतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube