Download App

Share Market Investment: मोदींची नजर आता IAS, IPS यांच्या गुंतवणुकींवर

Share Market Investment: मोठ्या प्रमाणात कमाई करण्यासाठी शेअर मार्केटमध्ये (Share Market) सामान्य नागरिकांपासून मोठे गुंतवणूकदार आपले नशीब फुलवत आहेत. परंतु देशामध्ये धोरणे बनवणारे आणि त्याची अंमलबजावणी करणारे सरकारी अधिकारी मार्केटमध्ये आपला पैसा गुंतवून (Share Market Investment) मोठ्या प्रमाणात नफा कमावत आहेत का ? यासंदर्भामध्ये केंद्र सरकारने (Central Govt) आयएएस, आयपीएस आणि आयएफएस यांच्याकडून हिशेब मागवला जात आहेत. केंद्र सरकारकडून आता अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना सवाल करण्यात आला आहे की, ते गुंतवणूक कुठे करत आहेत.

वाढत असलेल्या महागाईवर मात करून शेअर मार्केटमध्ये आपल्या प्रत्येक गुंतवणूकदाराला मोठी कमाई करून देण्याची संधी मिळते. यामुळे अनेक व्यवसायात लोक शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून पैसे कमावतात आणि उत्पन्नाचा पर्यायी स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. या लोकांमध्ये अनेक आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. म्हणून या अधिकाऱ्यांसाठी केंद्र सरकारने नवा आदेश जारी करण्यात आला आहे.

मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्या अधिकाऱ्यांना आता सरकारच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. केंद्र सरकारने अखिल भारतीय सेवांच्या अधिकार्‍यांना एका कॅलेंडर वर्षात शेअर मार्केटातील त्यांचे एकूण व्यवहार किंवा इतर गुंतवणूक त्यांच्या ६ महिन्यांच्या मूळ पगारापेक्षा जास्त असल्याची माहिती देण्यास सांगितले आहे.

देशात कोरोना वाढतोय, डब्ल्यूएचओनो सांगितलं कारण…

अधिकाऱ्यांसाठी नवीन नियम ?

कार्मिक मंत्रालयाने यासंदर्भात निर्देश जारी करण्यात आला आहे, जो केंद्रीय मंत्रालयांच्या सचिवांना पाठवण्यात आला. अखिल भारतीय सेवा (आचार) नियम, १९६८ च्या नियम १६(४) अंतर्गत त्यांच्याद्वारे प्रदान केल्या जाणार्‍या तत्सम माहितीच्या व्यतिरिक्त हे असणार असल्याचे सांगितले जात आहे. हे नियम अखिल भारतीय सेवा- भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय वन सेवा (IFS) या अधिकाऱ्यांना लागू होणार आहे.

ही माहिती द्यावी लागणार

सरकारने अखिल भारतीय सेवा अधिकार्‍यांना कॅलेंडर वर्षात शेअर मार्केटातील एकूण व्यवहार किंवा इतर गुंतवणूक त्यांच्या ६ महिन्यांच्या मूळ मानधनापेक्षा जास्त असल्यास माहिती देण्याचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान, कोणत्याही एका शेअर, स्टॉकमध्ये किंवा गुंतवणुकीत सतत पैसे गुंतवले गेले आहे, तो सट्टा समजला जाणार आहे, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज