श्रीनगर : मोदी सरकारने केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये (Ladakh) पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे लडाखच्या लोकांना फायदा होईल. लडाखच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचे शाह म्हणाले. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग अशी लडाखमधील पाच नव्या जिल्ह्यांची नावे आहेत. याची माहिती अमित शहा यांनी ट्विट करून दिली आहे. (Centre Create 5 New Districts In Ladakh, Says Home Minister Amit Shah)
Union Home Minister Amit Shah tweets, "In pursuit of PM Narendra Modi's vision to build a developed and prosperous Ladakh, the MHA has decided to create five new districts in the union territory. The new districts, namely Zanskar, Drass, Sham, Nubra and Changthang, will take the… pic.twitter.com/t1kzz3fcgx
— ANI (@ANI) August 26, 2024
शाह यांनी ट्विट करून सांगितले की, गृह मंत्रालयाने लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. लडाखला विकसित आणि समृद्ध बनवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या जिल्ह्यांमध्ये झंस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग यांचा समावेश आहे.
5 ऑगस्ट 2019 रोजी भारत सरकारने कलम 270 चे अधिकार रद्द केले होते. यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. यानंतर 31 ऑक्टोबरपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख ही दोन स्वतंत्र राज्ये करण्यात आली. यासह तेथे संसदेचे अनेक कायदे लागू झाले. येत्या काही दिवसात जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार असून लडाख हा केंद्रशासित प्रदेश राहणार आहे.
2019 मध्ये, लडाख जम्मू आणि काश्मीरपासून वेगळे करत त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले. त्यााआधी लेह आणि कारगिल हे दोनच जिल्हे केंद्रशासित प्रदेशात होते. आता केंद्रशासित प्रदेस असलेल्या लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्यांची घोषणा करण्यात आली आहे.