MahaKumbh 2025: लाखो तरुण उच्चपदस्थ अधिकारी होण्याचं आपलं स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नागरी सेवा परीक्षेला बसतात. त्यापैकी फक्त काहीच जण परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होतात आणि केंद्र सरकारच्या विभागांमध्ये प्रतिष्ठित पदे मिळवतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC) उत्तीर्ण करण्यासाठी अनेक जण क्लास लावतात. मात्र, आर्थिक अडचणींमुळे ज्यांना क्लास लावणं शक्य नाहीये अशा उमेदवारांसाठी (IAS UPSC Coaching) प्रतापगड येथील एक चहा विक्रेता आशेचा किरण बनलाय.
रविंद्र चव्हाण यांच्यावर भाजपकडून मोठी जबाबदारी; प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती
गेल्या ४० वर्षांपासून चाय वाले बाबा अशी ओळख असलेले दिनेश स्वरूप ब्रह्मचारी हे नागरी सेवा परिक्षेची तयारी करणाऱ्यांना मोफत शिक्षण देत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ते दररोज दहा कप चहा पितात आणि मौनव्रत पाळतात.
चायवाले बाबा हे उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील आहेत. अभ्यासाकडे पाहण्याचा त्यांचा अनोखा दृष्टिकोन लक्ष सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेतोय. चायवाले बाबा कायम मौनात राहतात आणि या अद्भुत साधूचे आयुष्य फक्त दहा कप चहावर अवलंबून आहे. त्यांच्या शिक्षणाचे माध्यम व्हॉट्सअॅप आहे. हे चायवाले बाबा’ विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅपद्वारे अभ्यास साहित्य पुरवतात. नागरी सेवांची तयारी करणाऱ्या राजेश सिंह यांनी सांगितले की, मी गेल्या चार-पाच वर्षांपासून बाबांशी जोडल्या गेलोय. बाबा नागरी सेवेतील इच्छुकांना मोफत कोचिंग देतात देतात आणि व्हॉट्सअॅपद्वारे विद्यार्थ्यांना नोट्स देतात. बाबा गप्प राहतात, पण त्यांचे हावभाव आणि व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे आम्ही त्यांचं म्हणणं समजू शकतो. त्यांचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना अधिकारी बनवणं हे आहे, असं सिंह म्हणाले.
बाबांच्या मौनाचे कारण विचारले असता सिंह म्हणाले की, मौनामुळं उर्जेचा संचय होतो, ज्याचा उपयोग बाबा जगाच्या कल्याणासाठी करतात. दरम्यान, प्रयागराज येथील कुंभमेळ्याला आलेल्या चायवाले बाबांबद्दल ज्यांनी ऐकले, ते त्यांचे चाहते होत आहेत.