Jharkhand New CM : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी राजीनामा दिला आहे. चंपाई सोरेन (Champai Soren) हे पुढील मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांची विधीमंडळ पक्ष नेतेपदी निवड झाली आहे. चंपाई हे हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आहेत.
कोण आहेत चंपाई सोरेन?
सरायकेला-खरसावन जिल्ह्यातील जिलिंगगोरा गावातील आदिवासी रहिवासी सिमल सोरेन शेती करायचे. त्यांच्या चार मुलांपैकी मोठ्या मुलाचे नाव चंपाई सोरेन आहे. चंपाईही वडिलांना मदत करत असे. चंपाईने सरकारी शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतले. दरम्यान, त्यांचे लहान वयातच माणकोशी लग्न झाले. लग्नानंतर चंपाईला 4 मुलगे आणि तीन मुली झाल्या.
याच काळात बिहारपासून वेगळ्या झारखंड राज्याची मागणी जोर धरू लागली. शिबू सोरेन यांच्यासोबत चंपाई देखील झारखंडमधील चळवळीत सामील झाले. त्यानंतर ‘झारखंड टायगर’ या नावाने प्रसिद्ध झाले. यानंतर चंपाई सोरेन यांनी सरायकेला मतदारसंघातून पोटनिवडणुकीत अपक्ष आमदार बनून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ते झारखंड मुक्ती मोर्चात सहभागी झाले.
मोठी बातमी! झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक!
#WATCH | Ranchi: Jharkhand CM Hemant Soren reaches Raj Bhawan.
ED had been questioning CM Soren in connection with a money laundering case linked to an alleged land scam. pic.twitter.com/6S0b4OSzdu
— ANI (@ANI) January 31, 2024
भाजप सरकारमध्ये मंत्री होते
भाजप नेते अर्जुन मुंडा यांच्या 2 वर्षाच्या 129 दिवसांच्या सरकारमध्ये चंपाई सोरेन यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले होते. त्यांना महत्त्वाची मंत्रिपदे देण्यात आली होती. चंपाई हे 11 सप्टेंबर 2010 ते 18 जानेवारी 2013 पर्यंत मंत्री होते.
17 IAS अन् ….. IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; अमितेशकुमार पुण्याचे नवे CP
यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आणि त्यानंतर हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा सरकारमध्ये चंपाई सोरेन यांना अन्न, नागरी पुरवठा आणि वाहतूक मंत्री करण्यात आले.
Champai Soren to be the new Chief Minister of Jharkhand pic.twitter.com/xWeGAqKr8A
— ANI (@ANI) January 31, 2024
हेमंत सोरेन यांच्या सरकारमध्ये दुसऱ्यांदा मंत्री
हेमंत सोरेन 2019 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर चंपाई सोरेन यांना परिवहन, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री करण्यात आले आहे. चंपाई झामुमोच्या उपाध्यक्षाही आहेत.