मोठी बातमी! झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक!

मोठी बातमी! झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक!

Hemant Soren Arrested: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या घरी ईडीकडून छापा टाकण्यात आला होता. अखेर आज सोरेन यांना अटक करण्यात आली आहे. हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सुत्रे जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, अद्याप तरी याबाबत ठोस माहिती समोर आलेली नसून पुढील काळात त्यांच्याकडेच सुत्र जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

IND vs ENG : जडेजा-राहुलच्या जागी कोण? ‘या’ 3 खेळाडूंमध्ये स्पर्धा; लवकरच होणार घोषणा

एकीकडे हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर आता गटनेतेपदी चंपई सोरेन यांची निवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता चंपई सोरेने यांनी हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करण्याबाबतचा प्रस्ताव कल्पना सोरेन यांनी ठेवला असल्याचा दावा भाजपचे कासदार निशिकांत दुबे यांनी केली आहे.

“मनोज जरांगे अन् आरक्षणाच्या वादापासून चार हात लांबच रहा” : अजितदादांच्या आमदार अन् मंत्र्यांना सूचना

झारखंडच्या राजकारणातील दिग्गज नेते चंपई सोरेन हेच पुढील मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. हेमंत सोरेन यांना अटक झाल्यास हेमंत सोरेन राजीनामा देतील आणि पुढील मुख्यमंत्री चंपई सोरेन हेच होणार असल्याचंही सांगितलं जात होतं मात्र, हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन याच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान, कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी सोरेने यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. सोमवारी ईडीकडून त्यांच्या निवासस्थानावर छाप्या टाकणार आला होता. हेमंत सोरेन यांना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याने झारखंडचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. झारखंडमध्येही बिहारचीच पुनरावृत्ती होणार असल्याची शक्यता आहे. कारण हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर ते पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सुत्रे सोपवणार असल्याचंही बोललं जात आहे. संपूर्ण घडामोडींवर राजकीय विश्लेषकांकडून अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या