Chandigarh University : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) पाकिस्तानला (Pakistan) मदत करणारे तुर्की (Turkey) आणि अझरबैजानला (Azerbaijan) दररोज भारतातून मोठे धक्के बसत आहे. तर आता आणखी एक मोठा धक्का तुर्की आणि अझरबैजानला बसला आहे. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (LPU) नंतर आता चंदीगड विद्यापीठाने तुर्की आणि अझरबैजानसोबतचा सामंजस्य करार रद्द केला आहे.
माहितीनुसार, चंदीगड विद्यापीठाने दोन्ही देशांच्या 23 विद्यापीठांसोबतचा करार रद्द केला आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी एलपीयूने राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देऊन तुर्की आणि अझरबैजानसोबत स्वाक्षरी केलेले सर्व सामंजस्य करार रद्द केले होते. अलिकडच्या भू-राजकीय घटनांचा हवाला देऊन विद्यापीठाने अलीकडेच तुर्की आणि अझरबैजानमधील संस्थांसोबतच्या सहा शैक्षणिक भागीदारी अधिकृतपणे संपवल्या.
मोठी बातमी! अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर तीव्रता 4.2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तुर्कीने पाकिस्तानला मदत केली होती. तुर्कीचे ड्रोन वापरुन भारतावर पाकिस्तानने हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता मात्र भारतीय एअर डिफेन्सने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले होते. तुर्कीने पाकिस्तानला मदक केल्याने अनेक व्यापाऱ्यांनी तुर्कीसोबत करार रद्द केले आहे.
सावध, डिलिव्हरी बॉक्स घोटाळा बँक खाते रिकामे करणार, पार्सल बॉक्स फेकून देण्यापूर्वी ‘हे’ काम कराच