Download App

Chandrayaan-3 : याला म्हणतात भारतीय संस्कृती! झोमॅटोने ISRO ला पाठवली खास डिश

  • Written By: Last Updated:

Chandrayaan-3 : भारतासाठी आजचा दिवस एक ऐतिहासिक दिवस असून, दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास श्रीहरीकोटा येथून भारताचे चांद्रयान 3 अवकाशात झेपावणार आहे. त्यासाठीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, करोडो भारतीयांसह सर्व जगाच्या नजरा भारताच्या या मिशनकडे लागलेल्या असून, हे मिशन यशस्वी व्हावे यासाठी करोडो भारतीय देव पाण्यात ठेवून बसलेले असून, लहानांपासून सर्वचजण त्यांच्यापरीने इस्त्रोला शुभेच्छा देत आहेत. या सर्व शुभेच्छांमध्ये चर्चा होतीय ती म्हणजे झोमॅटोने पाठवलेल्या डिशची.

अब चाँद पे पाँव जमाना है…! चांद्रयान-3 लॉन्चिंगपूर्वी ऑनलाईनच्या दुनियेत काय होतयं ट्रेन्ड

आतापासून अवघ्या काही मिनिटांनीचांद्रयान 3 चंद्राच्या दिशेने झेप घेणार असून, हा प्रक्षेपण कार्यक्रम तुम्ही घरी बसून पाहू शकाल. जर तुम्हाला हा लाँच इव्हेंट पाहायचा असेल तर, त्यासाठी तुम्हाला इस्रोच्या यूट्यूब चॅनेलवर जावे लागेल.

झोमॅटोने पाठवली खास डिश
दरम्यान, चांद्रयान 3 च्या लाँचिंगपूर्वी फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने इस्रोच्या अधिकाऱ्यांसाठी खास डिश पाठवली आहे. याबाबत कंपनीचे एक ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये झोमॅटोने आईची भूमिका साकारत झोमॅटोने मिशनच्या यशाबद्दल सांगितले आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक आई आपल्या मुलाला परीक्षेसाठी किंवा कोणत्याही कामात यश प्रात्प व्हावे यासाठी दही आणि साखर खाऊ घालते, त्याचप्रमाणे Zomato ने ISRO अधिकाऱ्यांना त्यांच्या मेहनतीसाठी शुभेच्छा देत इस्रोसाठी दही-साखर पाठवत असल्याचे म्हटले आहे.

 देशभरात उत्साहाचे वातावरण
चांद्रयान लॉन्चिंगसाठी संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण असून, बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमार, अनुपम खेर आणि सुनील शेट्टी आदींनी इस्रोच्या वैज्ञानिकांसह देशाला या लॉन्चिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दुसरीकडे 200 हून अधिक शालेय विद्यार्थी चांद्रयान-3 चे प्रक्षेपण पाहण्यासाठी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावर पोहोचले असून, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह पाहण्यास मिळत आहे. काहींनी आपल्याला कल्पना चावलासारखे अंतराळवीर व्हायचे स्वप्न असल्याचे सांगितले आहे.

Tags

follow us