Download App

Chandrayan 3 चा परतीचा प्रवास सुरू; ‘या’ कामासाठी परत येणार प्रोपल्शन मॉड्युल

Chandrayan 3 : चंद्रायान 3 (Chandrayan 3 ) या इस्त्रोच्या यशस्वी मोहिमेनंतर आता चंद्रयानाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामध्ये चंद्रयान 3 च्या प्रोपल्शन मॉड्युल हे पृथ्वीवर परत येणार आहे. त्याने आता पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला आहे. गेल्या महिन्यात 10 नोव्हेंबरला या प्रोपल्शन मॉड्युलने पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू केला होता. हे प्रोपल्शन मॉड्युल पृथ्वीवर परत येणार आहे. कारण त्याद्वारे चंद्रावरील नमुने पृथ्वीवर आणण्यात येणार आहेत.

चंद्राच्या कक्षेत 3 महिनेच राहणार होते प्रोपल्शन मॉड्युल

याबद्दल इस्त्रोकडून सांगण्यात आलं आहे की, ज्याप्रमाणे चंद्रयान 3 च्या विक्रम लॅंडरची चंद्राच्या पृष्ठभागावर हॉप टेस्ट करण्यात आली होती. त्याच प्रमाणे चंद्रयान 3 च्या प्रोपल्शन मॉड्युल जे चंद्राच्या 150 किमीच्या कक्षेत चंद्राच्या प्रदक्षिणा घालत होता. त्याने आता पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला आहे. हे प्रोपल्शन मॉड्युल चंद्राच्या कक्षेत 3 महिनेच राहणार होते.

राजपूत करणी सेनेच्या सुखदेव सिंह गोगामेडींची गोळ्या झाडून हत्या

इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या कौशल्यामुळे या प्रोपल्शन मॉड्युलमध्ये 100 किलो इंधन शिल्लक राहिलं होतं. त्याच उरलेल्या इंधनाचा वापर करून ते पृथ्वीच्या कक्षेत आलं आहे. त्यामुळे इस्त्रोचं चंद्रावरील नमुने मिळवण्याचं मिशन यशस्वी होणार आहे. हे प्रोपल्शन मॉड्युल सध्या 13 दिवसांत पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करत आहे. तसेच त्याची कोणत्याही उपग्रहाला टक्कर होण्याची शक्यता नाही.

‘तळपता सूर्य अन् घामानं थपथपलेलं शरीर’; मनोज वाजपेयीने उलगडला’जोरम’ चा आव्हानात्मक प्रवास

दरम्यान प्रोपल्शन मॉड्युल हे पृथ्वीवर परत येणं हा इस्त्रोचा नवा प्रयोग ठरणार आहे. ज्याप्रमाणे इस्त्रोने चंद्रयान 3 ला चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरवले. एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील 14 दिवस लॅंडर विक्रम आणि रोवर प्रज्ञानने प्रवास केला. त्यानंतर त्यांना वेगवेगळं करणाऱ्या प्रोपल्शन मॉड्युलला पृथ्वीवर परत देखील आणू शकतो. तर लॅंडर विक्रम आणि रोवर प्रज्ञानला वेगवेगळं करण्याचं काम होतं. त्यानंतर तो चंद्राच्या 150 किमीच्या कक्षेत चंद्राच्या प्रदक्षिणा घालत होता.

Tags

follow us