Download App

Chandrayan 3 चं काम अंतिम टप्प्यात, विक्रम-प्रज्ञान स्लीप मोडच्या तयारीत; इस्त्रो प्रमुखांची माहिती

  • Written By: Last Updated:

Chandrayan 3 : 23 ऑगस्टला चंद्रयान 3 (Chandrayan 3) चंद्राच्या पृष्ठभागावर लॅन्ड झालं. तेव्हापासून ते कामाला लागलं होतं. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर प्रज्ञाग रोव्हर चांगल्या पद्धतीने फिरत-फिरत महत्त्वाची गोळा करण्याचे काम करत असून, प्रज्ञानने चंद्रावर नॉट आऊट शतकी खेळी पूर्ण केली आहे. लँडरमधून बाहेर पडल्यानंतर प्रज्ञानने आतापर्यंत 100 मीटरचे अंतर कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण केले आहे. मात्र आता विक्रम लॅन्डर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडवर जाणार आहे.

‘शासन आपल्या दारी’साठी मराठा आंदोलन चिरडण्याचा डाव; अशोक चव्हाणांचे गंभीर आरोप

विक्रम लॅन्डर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडवर जाणार

आता विक्रम लॅन्डर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडवर जाणार आहे. कारण आता चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्रयान (Chandrayan 3) पोहचून 14 दिवस लवकरच पूर्ण होतील. तोपर्यंत चंद्रावर दिवस होता. आता चंद्रावर रात्र होणार आहे. जो दिवस किंवा रात्र ही पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबर असणार आहे. त्यामुळे आता चंद्रयान 3 चे विक्रम लॅन्डर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडवर जाणार आहेत.

आरक्षणाच्‍या प्रश्‍नावरुन गृहमंत्र्यांना बदनाम करण्‍याचा प्रयत्न; फडणवीसांच्या मदतीला विखे धावले…

विक्रम आणि प्रज्ञान मोडवर का?

चंद्रयान 3(Chandrayan 3) चे विक्रम लॅन्डर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडवर जाणार आहेत. कारण या रात्रीच्या वेळी चंद्रावरील तापमान -200 डिग्री सेल्सिअसच्या खाली येण्याची शक्यता आहे. त्या वातावरणात विक्रम लॅन्डर आणि प्रज्ञान रोव्हर काम करू शकणार नाहीत त्यामुळे त्यांना मोडवर टाकण्याची तयारी इस्त्रोकडून केली जात आहे. अशी माहिती इस्त्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी आज शनिवारी दिली.

दरम्यान आज चांद्रयान 3 (Chandrayan 3) नंतर भारताचं पहिलं सूर्य मिशन आदित्य L1 चे (Aditya L1 Mission) आज प्रक्षेपण झालं आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोने आणखी एक धाडसाची कामगिरी केली आहे. संपूर्ण भारतवासियांचे लक्ष या आदित्य L1 च्या (Aditya L1 Mission) प्रक्षेपणाकडे लागले होते. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन प्रक्षेपण तळावरून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण करण्यात आले आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज